एक्स्प्लोर

Sudhir Salvi: मला तुमच्याशी बोलायचं आहे! सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण; ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवडी विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट, सुधीर साळवींनी समर्थकांना जमायला सांगितलं

मुंबई: शिवडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी आता आपल्या समर्थकांशी जाहीर संवाद साधायचे ठरवले आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत अजय चौधरी (Ajya Chaudhari) आणि सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस होती. मात्र, गुरुवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांच्या बाजूने कौल दिला होता. त्यानंतर सुधीर साळवी हे उद्धव ठाकरे यांना नमस्कार करुन मातोश्रीवरुन बाहेर पडले होते. यानंतर शिवडीतील (Shivdi Vidhan Sabha) सुधीर साळवी यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. यानंतर आता सुधीर साळवी यांनी आपल्या समर्थकांशी जाहीर संवाद साधायचे ठरवले आहे.

सुधीर साळवी यांनी काहीवेळापूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सुधीर साळवी यांनी आपल्या समर्थकांना साद घातली आहे. 'माझ्या प्रिय, शिवडी विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिकांनो, मला तुमच्याशी बोलायचं आहे!', असा मजकूर या पोस्टमध्ये लिहला आहे. शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता लालबाग मार्केटमधील शिवसेना शाखेजवळ सुधीर साळवी हे आपल्या समर्थकांशी जाहीर संवाद साधतील. यावेळी ते नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे मानद सचिव आहेत. गणेशोत्सवाच्या काळात लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटी, बडे राजकीय नेते आणि उद्योगपतींची रीघ लागलेली असते. या सगळ्यामुळे सुधीर साळवी यांचे बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. लालबागचा राजामुळे सुधीर साळवी हे शिवडीत प्रचंड लोकप्रिय आहेत. गेल्या वर्षभरापासून सुधीर साळवी यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरु केले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी संकटकाळात सोबत राहिलेल्या अजय चौधरी यांना झुकते माप दिले होते. त्यामुळे आता सुधीर साळवी वेगळी वाट निवडणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवडीत अद्याप महायुतीनेही आपला उमेदवारी जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता सुधीर साळवी काही वेगळा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांना धक्का देणार का, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

सुधीर साळवी मातोश्रीशी एकनिष्ठ राहणार?

काल अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधीर साळवी हे उद्धव ठाकरे यांना नमस्कार करुन मातोश्रीवरुन बाहेर पडले होते. त्यानंतर मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून  काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सुधीर साळवी हे लालबागमध्ये आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. तेव्हा त्यांनी आपल्या समर्थकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला होता.  शिवडी विधानसभेतील पाच पैकी पाच शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजुनं भूमिका घेतली होती. युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सुधीर साळवींच्या बाजुने कौल दिला होता. त्यामुळे सुधीर साळवी यांनी वेगळा निर्णय घेतल्यास शिवडीची लढाई ठाकरे गटासाठी अवघड होऊ शकते.

आणखी वाचा

मोठी बातमी : अजय चौधरी संकटकाळात सोबत राहिले, उद्धव ठाकरेंचे शब्द ऐकताच नमस्कार करुन सुधीर साळवी बाहेर पडले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali: सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
Suresh Dhas on Dhananjay Munde : वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
Tata Group : गुड न्यूज, टाटा ग्रुप पुढील 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार, एन. चंद्रशेखरन यांची घोषणा 
गुड न्यूज, टाटा ग्रुप पुढील पाच वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार, चेअरमन एन.चंद्रशेखरन यांची घोषणा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 27 डिसेंबर 2024 : ABP MajhaProtest In Beed For Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय मोर्चा,पोलिसांकडून चोख बंदोबस्तABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 27 December 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सSantosh Deshmukh Daughter Emotional : लातूरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा, संतोष देशमुख यांची मुलगी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakta Mali: सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
Suresh Dhas on Dhananjay Munde : वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
Tata Group : गुड न्यूज, टाटा ग्रुप पुढील 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार, एन. चंद्रशेखरन यांची घोषणा 
गुड न्यूज, टाटा ग्रुप पुढील पाच वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार, चेअरमन एन.चंद्रशेखरन यांची घोषणा 
Crime : कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
Beed Morcha: 400 अंमलदार, 4 डीवायएसपी तैनात, वाहतुकीत बदल; बीडच्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाची फिल्डिंग
400 अंमलदार, 4 डीवायएसपी तैनात, वाहतुकीत बदल; बीडच्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाची फिल्डिंग
Beed Morcha: भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली,  रडत रडत म्हणाली..
भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली, रडत रडत म्हणाली..
Embed widget