Solapur loksabha Exit poll : सोलापुरात काँग्रेस मुसंडी मारणार की पुन्हा भाजपचं, एक्झिट पोलमध्ये धक्कादायक अंदाज
Tv9 च्या एक्झिट पोलनुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर भाजपचे राम सातपुते हे या निवडणुकीत पराभूत होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Solapur loksabha election Exit poll : सोलापूर लोकसभा मतदारसंघ (Solapur loksabha election) यावेळी चांगलाच चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी काँग्रेसकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून राम सातपुते (Ram Satpute) निवडणुकीच्या मैदानात होते. या मतदारसंघात मागील दोन वेळेस भाजप (Bjp) उमेदवाराने बाजी मारली होती. पण यावेळी tv9 च्या एक्झिट पोलनुसार या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर राम सातपुते हे या निवडणुकीत पराभूत होण्याची शक्यता वर्तवली आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अंतिम निकाल हा 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. त्यावेळीच सगळी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
महायुती आणि मविआमध्ये जोरदार टक्कर
एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये दिसली रस्सीखेच
महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज
महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज
महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
भाजप 17 जागा
शिंदे गटाला 6 जागा
अजित पवार गट 1 जागा
महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
शिवसेना ठाकरे गट 9 जागा
काँग्रेस 8 जागा
शरद पवार गटाला 6 जागा
महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा शक्य
2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 च जागा शक्य
शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरणार
TV9 एक्झिट पोलनुसार कोणता पक्ष किती जागा जिंकणार?
TV9 एक्झिट पोलनुसार भाजप 19 जागांवर विजयी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
तर अजित पवार गटाला 0 तर ठाकरे गटाला 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसला 5 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज TV9 एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Lok Sabha Poll of Exit Poll : एबीपी, चाणक्य, माय अॅक्सिस ते पोलस्टार, सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी!
Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.