एक्स्प्लोर

भीमा कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधी काम केलं, सोलापुरातील चिंतन बैठकीत खासदार महाडिकांसमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ

सोलापूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून चिंतन बैठक (Bjp Meeting) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Solapur Bjp Meeting News : सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुतेंचा (Ram Satpute) परभव केला आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून चिंतन बैठक (Bjp Meeting) आयोजित करण्यात आली होती. भाजपाचे खासदार आणि सोलापूर निरीक्षक धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु होती. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमातच गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. विकास वाघमारे, सुदर्शन यादव व यतिराज होनमाने, श्रीमंत बंडगर अशी गोंधळ घातलेल्या युवकांची नावे आहेत. 

भीमा साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा आरोप 

खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असेलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे.  लोकसभेच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा प्रकार घडला आहे. लोकसभेतील पराभवानंतर पहिल्यांदाच ही बैठक आयोजित केली होती. दरम्यान गोंधळ सुरू होताच माध्यम प्रतिनिधींना बाहेर थांबवण्यात आले होते. गोधळानंतर बंद दाराआड बैठक सुरु आहे. 

पराभव झालेल्या ठिकाणी भाजपच्या वतीनं चिंतन बैठकांचं आयोजन 

दरम्यान, ज्या ज्या मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्या त्या मतदारसंघात भाजपच्या वतीनं चिंतन बैठकांचं आयोजन केलं जात आहे. नेमका परभाव का झाला? याची कारण शोधली जात आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातही भाजपला पराभवचा धक्का बसला आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी मोठ्या फरकानं राम सातपुते यांचा पराभव केला होता. 

सलग दोन टर्म म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांचा परभाव करत शरद बनसोडे निवडूण आले होते. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचे जय सिद्धेशवर स्वामी हे निवडूण आले होते. यावेळी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचाच पराभव केला होता. यावेळी मात्र, गमावलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सोलापुरात भाजपचा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता, निवडणूक निकालानंतर प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget