एक्स्प्लोर

बार्शीत इतिहासाची पुनरावृत्ती, सत्ताधारी पक्षाच्या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराच्या नशीबी हार

राऊतांनी अपक्ष उभे राहत सोपलांना पराभूत केले आहे. यापूर्वी दिलीप सोपल यांनी देखील अपक्ष उभे राहत राऊतांचा पराभव केला होता. तेव्हा राऊत काँग्रेसकडून उभे होते आणि ही जागा काँग्रेसला सुटल्याने सोपलांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती.

मुंबई : बार्शी तिथं सरशी हा शब्द बहुतेकांच्या ओळखीचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे राजकारण राज्यभरात चर्चिले जाते. प्रादेशिक दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात असलेला बार्शी मतदारसंघ लोकसभेला मात्र मराठवाड्यात जातो. या मतदारसंघाला एक नाही अनेक इतिहास आहेत. आजच्या विधानसभेच्या निकालात देखील एका इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. तो इतिहास म्हणजे या मतदारसंघात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारा उमेदवार निवडून येत नाही. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप सोपल यांचा त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी पराभव केला आणि पुन्हा त्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. सलग सहा वेळा विधानसभेवर गेलेले दिलीप सोपल यांनी देखील सहा पैकी पाच वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. अपक्ष असताना त्यांना आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपद मिळाले होते. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे राजेंद्र राऊत यांची गोची झाली. कारण शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने हे तिकीट सोपलांना मिळाले. परिणामी राऊतांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. शिवसेना सत्तेत असल्याने सोपल यांचे पारडे जड मानले जात होते मात्र इतिहास राऊत यांच्या बाजूने होता की काय असेच म्हणावे लागेल. कारण राऊतांनी अपक्ष उभे राहत सोपलांना पराभूत केले आहे. यापूर्वी दिलीप सोपल यांनी देखील अपक्ष उभे राहत राऊतांचा पराभव केला होता. तेव्हा राऊत काँग्रेसकडून उभे होते आणि ही जागा काँग्रेसला सुटल्याने सोपलांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती. 'रोलर'ने राऊतांना भरली होती धडकी  बार्शी विधानसभेत सोपल आणि राऊत यांच्या विजय किंवा पराभवात राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर हे किती मतं घेतात यावर फॉर्म्युला ठरत होता आणि चर्चा केली जात होती. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यावर अपक्ष उमेदवाराने राऊत यांना धडकीच भरवायला सुरुवात केली. विशाल कळसकर या अपक्ष उमेदवाराचे चिन्ह 'रोडरोलर' होते. एरवी कुठल्याही चर्चेत नसणारे कळसकर यांनी सुरुवातीच्या काही फेरींमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा अधिक मतं घेतली होती. याच कारण नंतर ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मात्र सर्वजण चकित झाले. कारण मतदारांनी राऊत यांचे ट्रॅक्टर समजून रोलरला मतं दिली अशी चर्चा आहे. खुद्द राऊत यांनी देखील विजयानंतर ही गोष्ट कबूल केली. रोडरोलर चिन्हामुळे आपला दहा हजार मतांचा लीड कमी झाला असे त्यांनी म्हटले. दुसऱ्यांदा सोपलांचा पराभव करत राऊतांनी विधानसभा गाठली 1999 पासून पुढचं राजकारण हे दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन नावांभोवतीच फिरताना पाहायला मिळत आहे. बार्शीत सध्या तरी 'साहेब' आणि 'भाऊ' या दोन नावाचेच पक्ष आस्तित्वात असल्याचे चित्र आहे. बार्शी विधानसभेचा 1962 पासूनचा इतिहास पाहिला तर बार्शी विधानसभेवर फक्त एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 1985 साली पहिल्यांदा निवडणूक लढविणारे दिलीप सोपल निवडून आले. 1985 साली शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसपक्षाकडून ते आमदार झाले. 1990 साली काँग्रेस, 1995 अपक्ष, 1999 राष्ट्रवादी काँग्रेस, 2009 अपक्ष, 2014 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर सोपल विधानसभेवर गेले. सलग सहावेळा वेगवेगळ्या चिन्हावर आमदार होण्याचा वेगळा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यासमोर विरोधक टिकू शकला नाही. पण 1999 पासून मात्र शेतकरी कुटुंबातून आलेल्या राजेंद्र राऊत अर्थात 'भाऊं'नी दिलीप सोपल अर्थात 'साहेबां'ना ठस्सल द्यायला सुरुवात केली. आज दुसऱ्यांदा त्यांनी सोपलांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे. बार्शी विधानसभा । बार्शी तिथं कुणाची व्हणार सरशी, 'साहेब' की 'भाऊ' कोण मारणार बाजी?

महत्त्वाच्या बातम्या

Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Embed widget