एक्स्प्लोर

सायन-कोळीवाड्यात तमिळ सेल्वन आमदारकीची हॅटट्रीक करणार? की, गणेश यादव यंदाचा भाजपचा विजय रथ रोखणार?

Sion-Koliwada Assembly Constituency: यंदा सायन-कोळीवाडा मतदारसंघात कॅप्टन आर. तमिल सेल्वन विरुद्ध गणेश कुमार यादव यांचा सामना रंगणार आहे. त्यामुळे यंदा भाजप गड राखणार की, काँग्रेसचे प्रयत्न यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Sion-Koliwada Assembly Constituency: सायन-कोळीवाडा विधानसभा निवडणुकीसाठी (Sion-Koliwada Assembly Election 2024) महायुतीतील (Mahayuti) भाजपचे (BJP) कॅप्टन आर तामिळ सेल्वन (Captain R. Tamil Selvan) यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aaghadi) काँग्रेसचे गणेश कुमार यादव (Ganesh Kumar Yadav) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कॅप्टन आर तमिळ सेल्वन यांनी विजय मिळवला होता. तसं पाहायला गेलं तर, 2009 पासून हा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. तेव्हापासूनच भाजपकडून हा मतदारसंघ हिसकावण्यासाठी काँग्रेसकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण,  कॅप्टन आर तमिळ सेल्वन यांची मतदारसंघावरची पकड मजबूत केली आहे. त्यामुळे यंदाही  कॅप्टन आर तमिळ सेल्वनच विजयी गुलाल उधळून हॅट्ट्र्रिक रचतील असं बोललं जात आहे. पण, काँग्रेसच्या गणेश कुमार यादव यांनी इतक्या वर्षात मतदारसंघातील जनसंपर्क वाढवला आहे. तसेच, अनेक कामंही त्यांनी मार्गी लावली आहे. त्यामुळे त्यांचाही जनसंपर्क तगडा आहे. अशातच  कॅप्टन आर तमिळ सेल्वन यांच्यासाठी यंदाची लढाई फारशी सोपी नसणार, यात काही शंकाच नाही.

2024 च्या विधानसभेच्या रिंगणात कोण आमने-सामने? 

उमेदवाराचं नाव पक्ष
कॅप्टन आर तामिळ सेल्वन (Captain R. Tamil Selvan) भाजप (महायुती)
गणेश कुमार यादव (Ganesh Kumar Yadav) काँग्रेस (महाविकास आघाडी)
संजय प्रभाकर भोगले (Sanjay Prabhakar Bhogle) मनसे

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 

भाजपाचे कॅप्टन आर.तमिळ सेल्वन 54,845 मतं मिळवून विजयी.
काँग्रेसचे गणेश कुमार यादव 40,894 मतांसह दुसऱ्या स्थानी होते. 

2014 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 

भाजपाचे कॅप्टन तमिळ सेल्वन 40,869 मतं मिळून विजयी 
शिवसेनेचे मंगेश सातमकर यांना 37,131 दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली

मतदारसंघाबाबत थोडंसं... 

भाजपच्या आधी सायन कोळीवाडा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. 2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाचा या क्षेत्रात प्रभाव स्पष्टपणे दिसत होता. पण 2014 च्या निवडणुकीत चित्र काहीसं पालटलं. भाजपनं इथे आपली पकड मजबूत केली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. तेव्हापासूनच हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. तमिल सेल्वन यांच्या विजयानंतर भाजपची पाळमुळं खोलवर रुजली. 2019 च्या निवडणुकीत कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांनी पुन्हा काँग्रेसचे उमेदवार गणेश कुमार यादव यांना 54,845 मतांनी हरवून आपला विजय कायम राखला. काँग्रेसचे गणेश कुमार यादव 40,894 मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले. या मतदारसंघात भाजपाचे कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांची मजबूत पकड आहे, पण काँग्रेसही इथे आपली पुन्हा एंट्री करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशातच यंदाही पुन्हा कॅप्टन आर. तमिल सेल्वन विरुद्ध गणेश कुमार यादव यांचा सामना रंगणार आहे. त्यामुळे यंदाही भाजप गड राखणार की, काँग्रेसचे प्रयत्न यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Embed widget