(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shrinivas Pawar VIDEO : उपचार थांबवून मुंबईहून आईला सभेसाठी आणलं, श्रीनिवास पवारांचा अजितदादांवर आरोप
Shrinivas Pawar : आम्ही टॅक्स भरतो, व्यवसाय सांभाळून राजकारण करतो. पण अजितदादा आता भाजपसोबत गेल्याने त्यांनी या गोष्टी शिकल्या असा टोला श्रीनिवास पवार यांनी लगावला.
पुणे : आईवर मुंबईत उपचार सुरू होते, पण ते थांबवून तिला बारामतीच्या सांगता सभेला आणलं गेलं असा आरोप श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर केला. या सर्व गोष्टी मी आईकडेच बोलत नाही. राजकारणाच्या संदर्भात चर्चा टाळतो. आई कधी चुकीचा निर्णय घेईल का? असंही ते म्हणाले. युगेंद्र पवार यांच्या शरयू मोटर्सवर करण्यात आलेल्या छापेमारीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजितदादा भाजपसोबत गेल्याने ते या सर्व गोष्टी शिकले असं श्रीनिवास पवार म्हणाले.
87 वर्षांच्या आईला सभेसाठी आणलं
श्रीनिवास पवार म्हणाले की, माझी आई 87 वर्षांची आहे. आईवर मुंबईत उपचार सुरु होते . ते उपचार थांबवून आईला मुंबईतून बारामतीला सांगता सभेसाठी अजित पवारांकडून आणण्यात आलं. मी आईला भेटलो तेव्हा आई म्हणाली की मी सभेला जाणार नाही . पण दुसऱ्या दिवशी आईला सभेला नेण्यात आलं. वय झालं की परावलंबित्व येतं.
या सर्व गोष्टी मी आईकडेच बोलत नाही. राजकारणाच्या संदर्भात चर्चा टाळतो. आई कधी चुकीचा निर्णय घेईल का? असंही श्रीनिवास पवार म्हणाले. अजित पवारांनी घर फोडल्याचा आरोप शरद पवारांवर करणं चुकीचं आहे. लोकसभेप्रमाणे युगेंद्र पवार विधानसभेला निवडून येतील असा विश्वास श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला.
अजितदादा भाजपसोबत गेल्याने हे शिकलेत
आमच्या शरयू मोटर्समधे येऊन पोलिसांनी तपासणी केली. आमचे बंधुराज आता भाजपसोबत गेल्याने त्यांचं सगळं शिकत आहेत. आमच्या कार्यालयाच्या तपासणीत काय सापडलं हे आम्हीच अधिकाऱ्यांना विचारलंय . मात्र त्याचं उत्तर मिळू शकलेल नाही. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच झालंय. आम्ही कायदा मानतो, आम्ही टॅक्स भरतो. व्यवसाय सांभाळून काम करतो. आमच्याकडे हे रेकॉर्ड आहे.
ही बातमी वाचा: