एक्स्प्लोर
शिवसेना बार्गेनिंग पॉवरमध्ये असल्यानं त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण होतील : रामदास आठवले
मुख्यमंत्री सेनेच्या सगळ्याच मागण्या मान्य करणार नाहीत, पण काही मागण्या पूर्ण होऊ शकतील. अरविंद सावंताना केंद्रात दुसर चांगलं खातं बदलून मिळण्याची देखील शक्यता आहे.
मुंबई : मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत वाद सुरू असून शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावे ही मागणी आहे सर्वच स्तरातून होत आहे. भाजपाला सत्ता स्थापनसाठी शिवसेनेशी युती करणे आवश्यक आहे. शिवसेना बार्गेनिंग पॉवर मध्ये असल्यानं शिवसेनेच्या जास्तीत जास्त मागण्या मान्य होऊ शकतील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री सेनेच्या सगळ्याच मागण्या मान्य करणार नाहीत, पण काही मागण्या पूर्ण होऊ शकतील, असेही ते या वेळी म्हणाले. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली त्यानंतर 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
शिवसेनेच्या योग्य त्या मागण्या भाजपनं मान्य करुन महायुतीची सत्ता लवकरात लवकर स्थापन करावी आणि सत्तेत रिपाइला वाटा मिळावा. शकतात. अरविंद सावंताना केंद्रात दुसर चांगलं खातं बदलून मिळण्याची देखील शक्यता आहे. दिवाळीतली भाऊबीज शिवसेना-भाजप या दोघांनी एकमेकांना ओवाळून साजरी करावी. या भाऊबीजेला मोठ्या भावाला लहान भावाला ओवाळवं लागेल असं दिसत आहे.
महाराजांचा निर्णय चुकला
मी उदयनराजेंना लोकसभेच्या निवडणूकीवेळीच रिपाइतं येऊन निवडणूकीत उतरा असं सांगितलं होतं पण, राजेंनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवलेली लोकांना आवडलं नाही. साता-यात अचानक पाऊस आला त्यात शरद पवार भिजले आणि मतांच्या पावसात श्रीनिवास पाटील भिजले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement