एक्स्प्लोर
Advertisement
साताऱ्यातील नागरिकांच्या भल्यासाठी आम्ही एकत्र : शिवेंद्रराजे भोसले
भाजपमधील प्रवेशानंतर त्यांनी ‘एबीपी माझा’च्या ‘तोंडी परीक्षे’त विविध प्रश्नांना कधी खुमासदार तर कधी सडेतोड उत्तर दिली. शरद पवारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे.
मुंबई : साताऱ्यातील जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. वैयक्तिक पातळीवर जरी मतभेद असले तरी आगामी काळात जनतेच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम करणार असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. ‘एबीपी माझा’ आयोजित ‘तोंडी परीक्षा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
भाजपमधील प्रवेशानंतर त्यांनी ‘एबीपी माझा’च्या ‘तोंडी परीक्षे’त विविध प्रश्नांना कधी खुमासदार तर कधी सडेतोड उत्तर दिली. भाजप प्रवेशाबाबत ते म्हणाले, सध्या राजकीय वातावरण बदलत आहे. पक्षावर निष्ठा असली तरी नेत्यांनाही जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यावे लागतात. मात्र, शेवटी जनताच पक्ष वाढवते.
साताऱ्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित आहेत. टोलनाका, नवीन औद्योगिक प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय असे महत्त्वाचे प्रश्न पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. ही सर्व कामे सरकारच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण होणार नाहीत. हाच विचार करुन भाजप मध्ये प्रवेश केल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले.
साताऱ्याच्या प्रगतीवर भाष्य करताना ते म्हणाले, सध्या साताऱ्यात दोन एमआयडीसी आहेत. नवीन औद्योगिक प्रकल्पासाठी सध्या जागा उपलब्ध नसल्याने अनेक प्रकल्प रखडले आहेत. हायवेविषयी कायमच सातारकरांच्या मनात नाराजी आहे. नागरिकांकडून टोल आकारला जातो. मात्र पैसे आकारून देखील त्यांना सुविधा मिळत नाही. ठेकेदाराचेही याकडे लक्ष नाही. ठेकेदाराने व्यवस्थित काम पूर्ण करावे हीच अपेक्षा आहे.
शरद पवारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. आजही ते माझ्या आदरस्थानी आहेत. माझ्या वडिलांची त्यांच्यावर श्रद्धा होती आणि माझीही आहे. माझ्या वडिलांनी खासदारकीची निवडणूक फक्त शरद पवारांच्या आग्रहामुळे लढवली, असे ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement