ताप काय आला, दरे गावात काय गेले.., शेवटी BJP सांगेल तेच करायचंय, मनसेचा एकनाथ शिंदेंना टोला
MNS on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मिळालेल्या महायुतीच्या यशानंतर विरोधी पक्षांकडून EVMवर संशय व्यक्त होतोय. दरम्यान मनसेनंही एकनाथ शिंदेंना टोला लगावत EVM वर संशय घेतलाय.
MNS on Eknath Shinde: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघारी फिरत एकनाथ शिंदेंनी भाजपला रस्ता मोकळा करून दिला. दुसरीकडे निवडणुकीतील पराभवानंतर विरोधक evm वर संशय घेत आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान तब्येतीचा कारणामुळे दरेगावात एकनाथ शिंदे गेल्याने विरोधकांकडून शिंदेंवर टोलेबाजी होत आहे. या टोलेबाजीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उतरली आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ईव्हीएमवर संशय घेत दरेगावात जाण्यावरून एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला.. ते दरे गावात जाऊन काय बसले... शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे. ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय राजू पाटील यांनी व्यक्त केला. कल्याण ग्रामीण मतदारसंघात वाढलेली 65 हजार मते यांनाच कसे पडली असा सवाल करत हे सगळं संशयास्पद असल्याचं मनसे माजी आमदार राजू पाटील म्हणालेत.
मनसेचा EVM वरून एकनाथ शिंदेंना टोला
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केलाय .कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण 65 हजार मतदान वाढले आणि 66 हजार मतांनी शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झालेत . वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का ? असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे .एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्याकरीता आठ लाख रुपये भरले आहेत असा आरोप मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला.
काय म्हणाले राजू पाटील?
विधानसभेच्या निकालानंतर विरोधी पक्षाकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातोय .वीरोधी पक्षांकडून ईव्हीएम विरोधात मोहीम देखील छेडण्यात आली आहे . मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केलाय . लोकसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघात 65 हजार मतदान वाढलं .हे वाढलेलं संपूर्ण मतदान विजयी उमेदवाराला कसं काय जाऊ शकतं असा सवाल मनसे नेते राजू पाटील यांनी केलाय . पाटील यांनी लागलेल्या निकालाचा स्वीकार निकालाचा केलाय मात्र.राज्यात ज्या गोष्टी घडतायत ,ईव्हीएम बद्दल बोंबाबोंब चालू आहे , मनसेने 2018 मध्ये ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू केली होती .. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक लोक मला भेटतात तुम्हालाच भरभरून मतदान केलं , मात्र ते दिसत नाही असं सांगतात. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असल्याने व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी आठ लाख रुपये भरले आहेत . ईव्हीएम च्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या काय राजकीय घडामोडींना सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला ,ते दरे गावात जाऊन काय बसले ..शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे मात्र ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय राजू पाटील यांनी व्यक्त केला