एक्स्प्लोर

कट्टर शिवसैनिक म्हणणाऱ्या आंधळकरांचा सेनेला धक्का, वंचितकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर

शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारी जाहीर झालीय. 

Dharashiv Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. धारशिव लोकसभा (Dharashiv Loksabha) मतदारसंघातून ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) निवडणूक लढवत आहेत, तर महायुतीकडून अजित पवार गटाच्या अर्चना पाटील (Archana Patil) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यानं शिवसेना शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली होती. कोणत्याही शिवसैनिकाला तिकीट द्यावं अशी भूमिका घेतली होती. मात्र, अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम राहीली आहे. त्यामुळं शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) लोकसभेची उमेदवारी जाहीर झालीय. 

कालच आंधळकरांनी घेतली होती प्रकाश आंबेडकरांची भेट 

दरम्यान, कालच भाऊसाहेब आंधळकर यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होतीय यावेळी त्यांनी मी वेगळ्या कामासाठी त्यांची भेट घेतली असल्याचे सांगितले होते. मी कट्टर शिवसैनिक असल्याचे आंधळकर म्हणाले होते. मात्र, आज त्यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तसेच धाराशिव लोकसभेच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, या मतदारसंघातून कोणत्याही शिवसैनिकाला तिकीट द्यावे, कापण हा पारंपारिक शिवसेनेचे मतदारसंघ असल्याचे आंधळकर म्हणाले होते.  

कोण आहेत भाऊसाहेब आंधळकर?

भाऊसाहेब आंधळकर हे आता वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, भाऊसाहेब आंधळकर हे नेमके कोण आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. भाऊसाहेब आंधळकर हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नोकरी सोडून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. 2011 साली त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर राज्यातील राजकीय घडामोडीनंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख होती. पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. माजी विधानसभा सभापती वसंत डावखरे यांच्यासोबतचा त्यांचा वाद गाजला होता. आंधळकर यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला होता. तसेच आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते. दरम्यान, आंधळकर यांचे नाव सातत्यानं चर्चेत असते. एक आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 

महत्वाच्या बातम्या:

धाराशिवमधून कोणत्याही शिवसैनिकाला उमेदवारी द्या, अन्यथा क्रांती करु, शिवसेना शिंदे गट आक्रमक

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget