एक्स्प्लोर

मराठवाड्यात शिवसेना-भाजपमध्ये ‘या’ जागांवर होऊ शकते बंडखोरी

शिवसेना भाजपची युती झाली तर मराठवाड्यातली बंडखोरी हे सेना-भाजपाची 100% डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे.

मुंबई : राज्यात शिवसेना भाजप युतीचं त्रांगडं सुटण्याचं नाव घेत नाही. स्थानिक पातळीवरसुद्धा जागांच्या मागणीवरुन शिवसेना भाजपमध्ये चांगलच घमासान सुरु आहे. युती झाली तरी या इच्छूकांना कसं आवरायचं हे मोठं कोडं दोन्ही पक्षासमोर असणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपा मधील बंडखोरी अटळ आहे. शिवसेना-भाजपची युतीची चिंता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना किती आहे माहीत नाही. परंतू गेल्या पाच वर्षांपासून विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून उभा असलेल्या दोन्ही पक्षाच्या नेत्याला जरूर आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा वेगळी लढली आणि तेव्हापासूनच प्रत्येक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढायला सुरुवात झाली. मराठवाड्यातील अनेक मतदारसंघातील भाजपाच्या नेत्यांनी युती होऊ नये म्हणून नेत्यांनी तर देवच पाण्यात ठेवले आहे. मराठवाड्यात 46 जागांपैकी 22 जागांवर शिवसेना-भाजपा युती झाली तरी बंडखोरी अटळ असल्याचे सध्याचे चित्र आणि बंडोबांना थंड करण्याचं  मोठं संकट आहे. VIDEO | शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर | ABP Majha मराठवाड्यात बंडखोरी होऊ शकते अशा जागा औरंगाबाद सिल्लोड मतदारसंघात काँग्रेसमधून अब्दुल सत्तार शिवसेनेत दाखल झाले आहेत. ती जागा भाजपची आहे. त्यामुळे भाजपा पाच वर्षांपासून इथे तयारी करते आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघासाठी शिवेसनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी भाजपमध्ये आले आहेत. आता युती झाली तर ही जागा शिवसेनेला जाईल. त्यामुळे येथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. गंगापूर मतदारसंघाची जागा युतीच्या जगावाटपात ही शिवसेनेला आहे. पण 2014 मध्ये भाजपचे प्रशांत बंब आमदार आहेत. त्यामुळे ही जागा जर भाजपला मिळाली तर सेनेचे इच्छुक उमेदवार बंडखोरी करु शकतात. औरंगाबाद पश्चिम या मतदारसंघात विद्यमान आमदार शिनसेनेचा आहे. पण याच मतदारसंघांमध्ये भाजपाच्या एका इच्छुक उमेदवारांने प्रचार कार्यालय देखील उघडले आहे. पैठण मतदारसंघाची जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. तेथील आमदार सेनेचा आहे, पण येथेही भाजपमधून इच्छुक उमेदवार बंडखोरी करु शकतात. बीड बीड मतदारसंघाची जागा शिवसेना भाजपच्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येतं आहे. याच जागेवर राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांना शिवनसेनेने प्रवेश दिला. मात्र या जागेवरुन शिवसंग्रामचे विनायक मेटे 2014 ला भाजपाच्या चिन्हावर लढले होते. त्यामुळे येथे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकाच मतदारसंघावर दावा केलाय. त्यामुळे या मतदारसमघात बंडखोरीची चिन्ह आहे. परभणी परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राहुल पाटील असतांना भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे भाजपकडून उमेदवारी मागत आहेत. आनंद भरोसे आणि राहुल पाटील यांच्यात व्यावसायिक व्यवहारातून वितुष्ट आलेलं आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. युती झाल्यास दोघांपैकी एकाला या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. गंगाखेड मतदारसंघ युतीत रासप कडे आहे. मागच्यावेळी रत्नाकर गुट्टे यांनी येथून रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, पण गुट्टे शेतकर्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याप्रकरणी तुरुंगात आहे. त्यामुळे आता या जागेवर भाजप आणि शिवसेना आपला हक्क सांगत आहेत. हिंगोली  हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेला असताना भाजपचे शिवाजी जाधव येथून उमेदवारी मागत आहेत. पक्षश्रेष्टींनी तसा लोकसभेवेळी त्यांना शब्द देऊन बंडखोरी पासून शमविले होते. पण यावेळी भाजप बंडखोरी कितपतं रोखू शकते हे पाहावे लागणार आहे. हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. पण शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे भाजपात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कळमनुरीची जागा त्यांच्यासाठी सोडवून घेऊ असा शब्द दिला होता.  त्यामुळे आता या जागेसाठीही रस्सीखेच सुरू आहे. नांदेड नांदेडमध्येही शिवसेना आणि भाजपात जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे. नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या दोन्ही मतदार संघावर शिवसेनेचा दावा आहे, यापैकी एकतरी जागा भाजपाला सोडावी यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. जालना जालन्यात बदनापूर मतदारसंघ  युती असताना आधी शिवसेनेकडे होता. 2014 च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक झाल्याने भाजपचे नारायन कुचे येथून निवडून आले. आता या मतदार संघावर पुन्हा भाजपने आणि शिवसेनेने दावा ठोकला आहे. उस्मानाबाद उस्मानाबादेत राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर उस्मानाबाद मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना आम्ही या जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याचं सांगतायेत. त्यांना ओमराजे निंबाळकरांचे बळ आहे. Shivsena BJP Alliance | शिवसेना-भाजप जागावाटपाबाबत तोडगा निघाला तरच उद्या युतीची घोषणा- सूत्र | ABP Majha शिवसेना भाजपाच्या युतीच्या घोषणेनंतर नाराजांना जवळ करता येईल या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस न काही मतदारसंघातील उमेदवार घोषित केले नाहीत. एमआयएमलाही असं वाटतं की मराठवाड्यात यश मिळवायचं असेल तर सेना-भाजपा वेगळी लढली पाहिजे किंवा बंडखोरी झाली पाहिजे. भाजपातील अनेक नेत्यांना वाटतंय की युती झाली नाही पाहिजे, म्हणजे संधी मिळेल. शिवसेना भाजपची युती झाली तर मराठवाड्यातली बंडखोरी हे सेना-भाजपाची 100% डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
Someshwar Karkhana Election : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget