(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shirur Lok sabha: बारामतीनंतर शिरुरमध्येही तुतारी चिन्हावरुन संभ्रम, तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह असणाऱ्या अमोल कोल्हेंची वाढणार चिंता
निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख तुतारी असा केला आहे. ट्रम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून बँड वादनात त्याचा समावेश होतो. मात्र, या ट्रम्पेटचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारी असे करण्यात आले आहे.
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच (Baramati Lok Sabha Election) आता शिरुर मतदारसंघातही (Shirur Lok Sabha Election) अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या खासदार अमोल कोल्हेची (Amo kolhe) चिंता काही प्रमाणात का होईना नक्कीच वाढलेली असेल. निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख तुतारी असा केला आहे. ट्रम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून बँड वादनात त्याचा समावेश होतो. मात्र, या ट्रम्पेटचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारी असे करण्यात आले आहे.
शिरुर लोकसभेत तुतारी हे चिन्ह मनोहर वाडेकरांना मिळालं आहे. वाद्य वेगवेगळी असली तरी निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हांच्या उल्लेखात तुतारी या शब्दाचं साम्य ठेवलेलं आहे. त्यामुळे चिन्ह पाहून मतदान करणाऱ्यांमध्ये याचा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे पाहता ट्रम्पेट चिन्हाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काही फटका बसतो का? हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईल.
चिन्हामध्ये मतदाराची दिशाभूल होणार नाही
निवडणूक आयोगाकडून मागितल्याप्रमाणे मला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. विरोधी पक्ष उमेदवाराला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. या चिन्हामध्ये मतदाराची दिशाभूल होणार नाही. परंतु या चिन्हाचा माझ्या उमेदवारीवर फरक पडू शकतो,असे मनोहर वाडेकर म्हणाले.
मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता
शिरूर लोकसभेत शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे या दोघांची ही चिन्ह बदलली आहेत. आढळराव आणि धनुष्यबाण हे गेल्या वीस वर्षाचं समीकरण यंदा बदललं आहे. आढळराव घडाळ्याच्या चिन्हावर तर याच घडाळ्याच्या चिन्हावर 2019 ला खासदार झाले त्या अमोल कोल्हेचं चिन्ह आता तुतारी फुंकणारा माणूस झालंय. खासदार कोल्हेच्या घड्याळ चिन्हावर आढळराव उभे राहिल्यानं मतदारामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात आता तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन नावांमध्ये तुतारी हा शब्द असल्याने मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
अमोल कोल्हेंकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
याविषयी अमोल कोल्हेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता अमोल कोल्हे हे देखील सुप्रिया सुळेंप्रमाणे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? तसेच नावातील तुतारी हा शब्द बदलून त्या ठिकाणी दुसरा शब्द देण्याची मागणी करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा :