Shirpur Vidhan Sabha Election Result 2024 : शिरपूरमध्ये भाजपचाच डंका, काशीराम पावरा विजयी, बुधा पावरा पराभूत
Shirpur Vidhan Sabha Election Result 2024 : शिरपूरमध्ये भाजपचे काशिराम पावरा विरुद्ध कम्युनिस्ट पक्षाचे बुधा पावरा विरुद्ध अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्यात तिरंगी लढत झाली.
Shirpur Vidhan Sabha Constituency : एकेकाळी काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या शिरपूर विधानसभा मतदारसंघातून (Shirpur Assembly Constituency) यंदा काँग्रेसचे चिन्हच हद्दपार झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीकडून (Mahayuti) काशिराम पावरा (Jaykumar Rawal) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मात्र शिरपूर विधानसभा मतदारसंघाची जागा ही कम्युनिस्ट पक्षाला दिल्याने काँग्रेसच्या चिन्हावरती यंदा एकही उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरपूरमध्ये भाजपचे काशिराम पावरा विरुद्ध कम्युनिस्ट पक्षाचे बुधा पावरा विरुद्ध अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्यात तिरंगी लढत झाली. शिरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे काशीराम पावरा विजयी झाले आहेत.
शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या 72 वर्षाच्या इतिहासात 5 वर्षे भाजपा, साडेसात वर्षे जनता पक्ष वगळता उर्वरीत 60 वर्षे काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. 1990 मध्ये अमरिशभाई पटेल या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तेव्हापासून त्यांनी तालुक्यावर वर्चस्व राखले. सन 1995, 1194 व सन 2004 असे 4 वेळा ते काँग्रेस पक्षाचे आमदार झाले. सन 2009 व 2014 मध्ये काँग्रेस पक्षाकडून काशिराम पावरा विजयी झाले. त्यानंतर काशीराम पावरा यांनी भाजपात प्रवेश केला. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या शिरपूर मतदारसंघात अचानक कमळ फुलले. सन २०१९ मध्ये भाजपाच्या चिन्हावर काशिराम पावरा तिसऱ्यांदा विजयी झाले. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे काशीराम वेचन पावरा यांनी 49174 मतांनी अपक्ष डॉ. जितेंद्र युवराज ठाकूर यांचा पराभव करून जागा पुन्हा जिंकली. आता काँग्रेससह महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत एकही उमेदवार मिळाला नसल्याने या मतदारसंघाची जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात आली.
शिरपूरमधून काशिराम पावरा विजयी
शिरपूर विधानसभा मतदार संघात भाजपा विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि तीन अपक्ष असे एकूण सहा जणांमध्ये लढत होणार असली तरी भाजपचे काशिराम पावरा विरुद्ध कम्युनिस्ट पक्षाचे बुधा पावरा यांच्यात प्रमुख लढत झाली. तर डॉ. जितेंद्र ठाकूर हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे या मतदारसंघातून नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भाजपच्या काशिराम पावरा यांचा या मतदारसंघातून विजय झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या