एक्स्प्लोर

Sharad Pawar : शिंदे म्हणाले ते देता आहेत घेता नाही, तुम्ही द्या पण लोकांचा मताचा अधिकार खरेदी करण्यासाठी देऊ नका : शरद पवार

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी बारामतीत वकील संघटनेच्या मेळाव्याला संबोधित केलं.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत वकील संघटनेच्या मेळाव्याला यावेळी संबोधित केलं. यावेळी त्यांनी संविधान बदलाचा मुद्दा, महाराष्ट्राची बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यावर भाष्य केलं. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं. बारामतीकरांना उद्देशून बोलताना तुम्ही मला दरवेळी निवडून दिलं घरी पाठवलं नाही, असं देखील शरद पवार म्हणाले.   

सत्ताधारी लोकांना संविधानात बदल करायचा होता.हेगडेंसारख्या काहींनी तशी भाषणं देखील केली होती.  मोदींनी सांगितले 400 पार द्या का ते सांगितले नाही. संविधानात बदल करायचा असेल तर तो आकडा 400 पार पाहिजे म्हणून तो सांगितला गेला होता. मात्र, लोकं आपल्यापेक्षा हुशार  लोकांनी सत्ता दिली पण 400 पारची ताकद दिली नाही, असं शरद पवार म्हणाले. 

राज्यात आपण 5 वर्षात 3 मुख्यमंत्री पाहिले. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. त्यांच्या सरकारमध्ये ते मंत्रिमंडळ मध्ये होते.  मी त्यांचे भाषण ऐकत होतो. ते म्हणाले मागच्या सरकारने चुका केल्या. पण ते हे विसरले की ते मागच्या मंत्रिमंडळामध्ये होते.

महाराष्ट्र हे 1 नंबरवरुन 6 वर गेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था याबाबत महाराष्ट्रचा नंबर खाली गेला आहे. आज स्त्रियांना सुरक्षा देण्याची गरज निर्माण झाली आहे.  बदलापूर प्रकरणात ज्यांच्यावर प्रशासन ठेवायची जबाबदारी आहे त्यांच्यावर आरोप केले गेले याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कायदा केला होता वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलींना अधिकार द्यायचा, याची आठवण देखील शरद पवार यांनी करुन दिली.

कुठंही काम करण्याची भूमिका गुजराती, तामिळनाडू, पंजाब मधील माणसाने घेतली. पण मराठी माणूस बाहेर जायचं म्हटलं की कपाळावर अट्या पडतो. त्यामुळे शेती कमी झाली, असं शरद पवार म्हणाले. आज विकासाच्या पध्दतीने काम होत नाही. काही लोकं करतात. काही जण म्हणतात विकासासाठी पक्ष सोडला, असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला.

सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीमध्ये मी कधीही पाहिले नाही असं झालं.पैशाचा गैरवापर झाला. रात्री बँक उघडी ठेवली. हे कधीही लोकसभेला पाहिले. देणाऱ्या पेक्षा घेणारे शहाणे निघाले, असं शरद पवार म्हणाले. 

एकनाथ शिंदेंना शरद पवार काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं ते म्हणतात आम्ही देता आहोत घेता नाही. लोकांचा मताचा अधिकार खरेदी करण्यासाठी  देऊ नका, एवढंच म्हणनं आहे. लोकांच्या आयुष्यात चांगला बदल करायचा असेल तर माझी काही हरकत नाही.. पण त्याचा वापर संसदीय पद्धती उद्धवस्त करण्यासाठी होऊ नये, यासाठी आग्रह आहे, असं शरद पवार म्हणाले. 

इतर बातम्या :

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Embed widget