एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shambhuraj Desai: एकनाथ शिंदेंचा प्रदिर्घ अनुभव; त्यांचा सहभाग शासनात हवा, शिवसेनेते काय सुरुय?, शंभूराज देसाईंनी सांगितलं!

Shambhuraj Desai: तिन्ही पक्षांचा मान राखला जाईल. येत्या एक-दोन दिवसांत योग्य तो मार्ग निघेल, असं शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Shambhuraj Desai: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची सकारात्मक चर्चा झाली. तिन्ही पक्षांचा मान राखला जाईल. येत्या एक-दोन दिवसांत योग्य तो मार्ग निघेल, असं शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज पत्रकार परिषद घेत दिल्लीतील बैठकीबाबत माहिती दिली. 

एकनाथ शिंदेंचा प्रदिर्घ अनुभव आहे. त्यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय बघता एकनाथ शिंदेंचा शासनात सहभाग असला पाहिजे, असं शिवसेनेचं मत आहे. एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत जी भूमिका घेतली, तिच आमची पण भूमिका आहे, असंही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं. 

शंभूराज देसाई नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंचा प्रदीर्घ अनुभव, त्यांनी घेतलेले निर्णय पाहता त्यांचा शासनात सहभाग असला पाहिजे असं मत शंभूराज देसाईंनी व्यक्त केलं. तसेच मागणी करणं आणि चर्चा करणं यात गैर नाही. मात्र आम्ही आमचे सर्व अधिकाराचे अधिकार एकनाथ शिंदेंकडे दिलेत. ते घेतील तो निर्णय मान्य असेल. एकनाथ शिंदेंच्या अनुभवाचा फायदा या महायुतीला मिळायला हवा, त्या अनुशंगाने आम्ही आग्रही आहोत ते शासनात असायला हवेत. तसेच मंत्रिमंडळात कोणाचं स्थान असणार हे मुख्यनेते ठरवतील, असंही शंभूराज देसाई यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. 

उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित-

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार की नाही, यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर एकनाथ शिंदे यांनी देखील स्वत: उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, असं अमित शाह यांनी सांगितले. मात्र एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय कळवला नाही, अशी सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे. आज मुंबईत पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

शंभूराज देसाई पत्रकार परिषदेत नेमकं काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra New CM: ठरलं! मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; दिल्लीत मोठा निर्णय, अमित शाह एकनाथ शिंदेंना म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 | सिटी 60 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एबीपी माझा ABP Majha : 29 NOV 2024ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 29 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स-Shilpa Shetty ED Raid : अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या घरावर ईडीचा छापा #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 29 November 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Mahayuti Oath Taking Ceremony: महायुती सरकारचा फॉर्म्युला ठरला; एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री स्ट्रक्चर कायम, कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
भाजप 20, शिवसेना 12-13 मंत्रिपदं, महायुतीचा फॉर्म्युला, अजितदादांचे किती आमदार मंत्री होणार?
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Embed widget