एक्स्प्लोर

Shahada Vidhan Sabha Result 2024: शहाद्यात राजेश पाडवी ठरले गेम चेंजर! थेट लढतीत भाजप वरचढ, उधळला विजयाचा गुलाल

Shahada Vidhan Sabha Constituency: 2014 आणि 2019 च्या मागील दोन निवडणुकांमध्ये येथून भाजपचे उमेदवार विजयी झालेत. यापूर्वी ही जागा काँग्रेसकडे होती.

Shahada Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आलेत. अनेक उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरले होते. महाराष्ट्रातील एकूण 288 जागांसाठी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडले, तर आज मतमोजणी होती.  नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात राजकीय वारे वाहू लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपेकीपैकी शहादा (Shahada Vidhan Sabha Constituency) दुसरा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून भाजपाचे राजेश पाडवी (Rajesh Padwi) विजयी झाले आहेत. तर यांच्याविरुद्ध कॉंग्रेसचे राजेंद्र कुमार गावित (Rajendra Kumar Gavit) रिंगणात होते. यंदा या निवडणूकीची अनोखी झलक पाहायला मिळली.

शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत

राजेश पाडवी -  विद्यमान आमदार  - भाजपा. (विजयी)
राजेंद्र कुमार गावित  - काँग्रेस (पराभूत)

या मतदारसंघात दुरंगी लढत होत असून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या समोर होते, अत्यंत चुरशीची ही थेट लढत पार पडली.

2019 मध्ये काय झाले?

2019 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर भाजपचे राजेश पाडवी यांनी काँग्रेसचे पद्माकर विजयसिंह वळवी यांचा पराभव केला होता. या जागेवर भाजपकडून राजेश पाडवी यांनी हात आजमावला होता, तर काँग्रेसने ज्येष्ठ वकील पद्माकर विजयसिंह वळवी यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. निकालाबाबत बोलायचे झाले तर दोघांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा होती. भाजपच्या राजेश यांना एकूण 94,931 तर काँग्रेसच्या पद्माकर यांना 86,940 मते मिळाली. अटी-तटीच्या लढतीत राजेश यांनी 7991 मतांनी त्यांचा पराभव केला. तर अपक्ष उमेदवार गेल्सिंग बिजला पावरा यांना 21,013 मते मिळाली.

आदिवासी समाजाच्या व्होट बँकेचे वर्चस्व 

महाराष्ट्रातील शहादा विधानसभा मतदारसंघ कोणत्याही एका पक्षाच्या ताब्यात आली नाही, येथील जनतेने सर्व पक्षांना संधी दिली आहे. शहादा विधानसभा मतदारसंघावर आदिवासी समाजाच्या व्होट बँकेचे वर्चस्व आहे. मात्र, मुस्लिम मतदारही येथे गेम चेंजरची भूमिका बजावत आहे. 2014 आणि 2019 च्या मागील दोन निवडणुकांमध्ये येथून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यापूर्वी ही जागा काँग्रेसकडे होती. यावेळी निकालाबाबतचा निर्णय लवकरच कळेल.

मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?

महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections  वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/  या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.

हेही वाचा>

Akkalkuwa Vidhan Sabha Constituency: अक्कलकुव्यात पाडवी कि गावित? चौरंगी लढतीत कोण ठरणार वरचढ? कोण उधळणार विजयाचा गुलाल?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget