एक्स्प्लोर

Akkalkuwa Vidhan Sabha Constituency: अक्कलकुव्यात पाडवी कि गावित? चौरंगी लढतीत कोण ठरणार वरचढ? कोण उधळणार विजयाचा गुलाल?

Akkalkuwa Vidhan Sabha Constituency: अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ 2008 नंतर अस्तित्वात आला. यापूर्वी विधानसभेची एकही जागा नव्हती. 2008 पासून काँग्रेसच्या के सी पाडवी यांनी ही जागा कायम राखली आहे.

Akkalkuwa Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सर्वत्र दिसत आहे. संपूर्ण राज्यात राजकीय डावपेचांची मालिका सुरू झाली आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून तीन दिवसांनी म्हणजेच 23 तारखेला मतमोजणी करायची आहे.  नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात (Akkalkuwa Vidhan Sabha Constituency Election) राजकीय वारे वाहू लागलेत. हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपेकीपैकी तिसरा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. त्यासाठी राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. (Nandurbar District Vidhan Sabha Election) आहेत. या मतदारसंघातून के.सी पाडवी (K C Padwi), आमश्या पाडवी (Amshya Padwi), हिना गावित (Hina Gavit), पदमाकर वळवी (Padmakar Walvi) यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. यंदा या निवडणूकीची अनोखी झलक पाहायला मिळणार आहे.

अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत

के.सी पाडवी - काँग्रेस.
आमश्या पाडवी - शिवसेना (शिंदे गट).
हिना गावित - भाजपा - बंडखोर.
पदमाकर वळवी - भारतीय आदिवासी पार्टी.

या विधानसभा मतदार संघात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यानी बंडखोरी केल्याने अडचणीत वाढ झाली आहे. ज्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत गावित यांना साथ दिली होती त्यांच्या विरोधात बंडखोरी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत आहे.

2019 च्या निवडणुकीत काय झाले?

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने के सी पाडवी यांना सलग तिसऱ्यांदा ही जागा लढवण्याची संधी दिली होती. पाडवी हे अनुभवी नेते आहेत आणि गेल्या तीन दशकांपासून राजकारणात त्यांची विश्वासार्हता टिकवून आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेने आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली होती. निकराच्या लढतीत अखेर काँग्रेसचा विजय झाला. काँग्रेसचे केसी पाडवी यांनी शिवसेनेच्या आमश्या पाडवी यांचा 2096 मतांनी पराभव केला. केसी पाडवी यांना 82,770 तर आमश्या पाडवी यांना 80,674 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते, ज्यांना 21,664 मते मिळाली होती.

के सी पाडवी जागा कायम राखणार का?

लवकरच निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. ज्यामध्ये कोणाच्या नशिबी सत्ता लिहिलीय हे जनतेला लवकरच कळेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत, त्यापैकी अक्कलकुवा विधानसभेची जागा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. अक्कलकुवा विधानसभेबद्दल बोलायचे तर ही जागा 2008 च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आली. यापूर्वी विधानसभेची एकही जागा नव्हती. 2008 पासून काँग्रेसचे केसी पाडवी यांनी ही जागा कायम राखली आहे.

हेही वाचा>>

Nandurbar Assembly Election 2024: नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? चारही मतदारसंघात काट्याची लढाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Embed widget