एक्स्प्लोर

भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी प्रतिज्ञापत्रात अनेक माहिती लपवली; महायुतीच्या बंडखोर उमेदवार आभा पांडे यांचा आक्षेप

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवार गटाच्या नेत्या आणि नागपूर पूर्व मतदारसंघातून महायुतीच्या बंडखोर उमेदवार आभा पांडे यांनी भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि नागपूर पूर्व मतदारसंघातून महायुतीच्या बंडखोर उमेदवार आभा पांडे (Abha Pande) यांनी भाजप उमेदवार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांच्या प्रतिज्ञापत्रा संदर्भात आक्षेप घेतले आहे. कृष्णा खोपडे यांच्या प्रतिज्ञापत्रात अनेक चुका असून त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये द्यावयाच्या अनेक माहिती लपवल्याचा आभा पांडे यांचा आरोप आरोप आहे. दरम्यान या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून घेतले आहेत. तर थोड्या वेळानंतर निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचा निर्णय देण्याची शक्यता आहे.

भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांच्यासाठी मोठी अडचण?

राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पहिली बंडखोरी नागपुरातून झाली आहे. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत, कोणत्याही परिस्थितीत पूर्व नागपूर मधून माझा उमेदवारी अर्ज परत घेणार नाही, असंही जाहीर करून टाकलं आहे. पक्षश्रेष्ठींनी निर्देश दिले तरीही मी पूर्व नागपूरच्या मैदानातून हटणार नाही. असं आभा पांडे म्हणाल्या. माझी लढत भाजप उमेदवारासोबत आहे, भाजपचे विद्यमान आमदार आणि यंदाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी पंधरा वर्षात कोणतेही विकास काम केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी मला जनतेमधूनच आग्रह असल्याचा दावाही पांडे यांनी केला.

विशेष म्हणजे आभा पांडे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. दरम्यान, त्यांनी आता  महायुतीतील प्रतिस्पर्धी असलेल्या आणि पूर्व नागपुरातील भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर आरोप केले आहे. नुकतेच कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र आभा पांडे यांचे आक्षेप ग्राह्य धरले, तर नागपूर पूर्व मतदारसंघात भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांच्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते

नागपुरातील 12 विधानसभा क्षेत्रांपैकी 11 मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा

राज्याच्या राजकारणात महत्वाचा ठरलेला विदर्भात भाजपचाच बोलबाला असल्याचे बघायला मिळाले आहे. तर एकट्या उपराजधानी नागपुरातील 12 विधानसभा क्षेत्रांपैकी 11 मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा असल्याचे चित्रा आहे. तर एकट्या रामटेकच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाला समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नागपुरात (Nagpur) कुठेही स्थान नाही. त्यामुळे आगामी काळात भाजप किती जागांवर विजय संपादन करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget