एक्स्प्लोर

शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त टळला, जागावाटपाचा तिढा कायम

पक्षांतर बंडाळी टाळण्यासाठी युतीची घोषणा लांबणीवर पडल्याचं आणखी एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे. नाराजीनाट्य, बंडखोरी किंवा पक्षांतरणामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते.

मुंबई : शिवसेना-भाजप युतीचं घोडं अवघ्या 10 जागांमुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे.

या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे उपस्थित होते. या चर्चेचा तपशील राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिला जाईल. मात्र आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि अमित शाह घेतील.

पक्षांतर बंडाळी टाळण्यासाठी युतीची घोषणा लांबणीवर पडल्याचं आणखी एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे. युती नाही झाली तर दोन्ही पक्षातील इच्छूक उमेदवारांना एका जागेवर संधी मिळू शकते. मात्र युती झाल्यास एका पक्षातील इच्छूक उमेदवाराला त्या जागेवर पाणी सोडावं लागेल. त्यामुळे नाराजीनाट्य, बंडखोरी किंवा पक्षांतरणामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे पक्षाचे एबी (AB) फॉर्म वाटप करताना वाद टाळण्यासाठी युतीच्या घोषणेची घाई नको, असा सूर वरिष्ठ पातळीवर असल्याचं कळतंय.

VIDEO |  144 जागा न दिल्यास युती तुटण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना नेते दिवाकर रावतेंची 'तोंडी परीक्षा'

केंद्रात मोदी व भाजपची वाढलेली ताकद, विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांचं झालेलं इनकमिंग आणि 2014 मधला भाजपचा महाराष्ट्रातला स्ट्राईक रेट पाहता भाजप 50-50 वर कधीच तयार होणार नाही असं दिसतंय. त्यातूनच सध्या भाजप-सेनेदरम्यान जागापाटपाचे अनेक फॉर्म्युले पुढे येतायत.

फॉर्म्युला 1

भाजप- 135

शिवसेना- 135

मित्रपक्ष- 18

----------------------------

फॉर्म्युला 2

भाजप- 171

शिवसेना- 117

मित्रपक्ष- भाजपच्या कोट्यातून

--------------------------------

फॉर्म्युला 3

भाजप- 162

शिवसेना- 126

मित्रपक्ष- भाजपच्या कोट्यातून

------------------------------------

फॉर्म्युला 4

भाजप- 150

शिवसेना-120

मित्रपक्ष- 18

-------------------------------------

फॉर्म्युला 5

भाजप- 145

शिवसेना-125

मित्रपक्ष- 18

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus Pink Ball Test : पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 06 December 2024 सकाळी 10 च्या हेडलाईन्सTop 90 at 9AM Superfast 06 December 2024 ९ सेकंदात बातमीABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 06 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सCM N DCM at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमी येथे बाळासाहेबांना अभिवादन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus Pink Ball Test : पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून तुम्ही स्वतःला शिट्ट्या वाजवण्यापासून रोखू शकणार नाही
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून क्रेझी झाली ऑडियन्स
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Embed widget