एक्स्प्लोर

शरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, साताऱ्यात दोन गटात वाद

माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात टोकाचा अंतर्गत वाद आहे.

सातारा : शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी उघड झाली. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याचा अनुभव आला. शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. गोंधळामुळे शरद पवारांनी भाषण थांबवलं. माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात टोकाचा अंतर्गत वाद आहे. या वादातून कविता म्हेत्रे स्टेजवर बसल्यामुळे शेखर गोरे यांनी स्टेजवर न येण्याचा निर्णय घेत खाली बसले. सर्वांनी त्यांना स्टेजवर येण्यासाठी विनंती केली, मात्र ते स्टेजवर न जाता खालीच बसले. यानंतर कविता म्हेत्रे यांनी भाषणाला सुरुवात करताच, शेखर गोरे यांच्या समर्थकांनी 'सर्व सांगा, खरं सांगा', असं म्हणत गोंधळ घालायला सुरुवात केली. हा वाद इतक्या टोकाला गेला की यात पोलिसांना मध्यस्थी करत सर्वांना खाली बसण्यास विनंती केली. खुद्द शरद पवारांनीही पुढाकार घ्यावा लागला. तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याने शरद पवार हताशपणे हा वाद पाहत राहिले. शेखर गोरे यांची प्रतिक्रिया "आमचा वाद प्रभाकर देशमुख यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादीत जिल्हास्तरावर वाद आहे. ते आम्हाला शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नाहीत," असा आरोप शेखर गोरे यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. कोण आहेत शेखर गोरे? माण तालुक्यातील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा शेखर गोरे यांच्यावर आरोप होता. गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. इतरही काही गुन्हे त्यांच्यावर नोंद होते. तेव्हापासून शेखर गोरे फरार झाले. जवळपास एक वर्षभर ते फरार होते. स्थानिक न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंततर जिल्हा न्यायालय आणि पुढे मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी जामीनासाठी प्रयत्न केला. उच्च न्यायालयाने त्यांना कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितले आणि माण तालुक्यात जायला बंदी घातली. काही दिवसांपूर्वी...म्हणजे मागील महिन्यात शेखर गोरे पोलिसांसमोर हजर झाले आणि त्यांना पोलिसांनी अटक केली आणि वडूज या खटाव तालुक्यातील न्यायलयात हजर केले. तिथे त्यांना लगेच जामीन मिळाला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्याकडे माण तालुक्याच नेतृत्व सोपवलं होतं. कॉंग्रेसचे माण तालुक्यातील आमदार जयकुमार गोरे यांचा सख्खा भाऊ असलेल्या शेखर गोरेंना राष्ट्रवादी काँग्रेसने फोडलं आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात बळ दिलं. मात्र 2014 ची निवडणूक ते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढले. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश करुन त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली. मात्र त्यामधेही कॉंग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. मागील वर्षभरापासून पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे होता. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांना दिलासा मिळाला होता. वेबसाईट व्हिडीओ यू ट्यूब व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

आपलं पर्यावरण संस्थेचा अनोखा उपक्रम! नाशिकमध्ये कावळा आणि गिधड यांच्यात निवडणूक, कोणत्या पक्षानं मारली बाजी? 
आपलं पर्यावरण संस्थेचा अनोखा उपक्रम! नाशिकमध्ये कावळा आणि गिधड यांच्यात निवडणूक, कोणत्या पक्षानं मारली बाजी? 
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
Satara District bank Chairman Election 2026 Shambhuraj Desai: काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, 10 उमेदवार बिनविरोध, शेकापचे बाबासाहेब पाटीलही भाजप पुरस्कृत पॅनेलमध्येच
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, 10 उमेदवार बिनविरोध, शेकापचे बाबासाहेब पाटीलही भाजप पुरस्कृत पॅनेलमध्येच

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Kartiki Ekadashi Pandharpur 2026: रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
Eknath Shinde Speech Kartiki Ekadashi Pandharpur 2026: सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
Embed widget