एक्स्प्लोर
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर निवडणुकीच्या मैदानात, अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून लढवणार निवडणूक
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. संजीव भोर यांनी शहरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर भोर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. संजीव भोर यांनी शहरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर भोर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीसाठी उभे असलेले संग्राम जगताप आणि सुजय विखे हे धनदांडगे असल्याचा आरोपही संजीव भोर यांनी केला आहे. एवढेच नाही तर जनतेला त्यांचे प्रश्न मांडणारा उमेदवार हवाय आणि तो आपण स्वतः असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
आपण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यात बैठका घेतल्या. समाजाच्या सर्व घटकातील लोकांचं मत आम्ही जाणून घेतलं. प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढली पाहिजे, असं मत सर्व घटकातील लोकांकडून मिळालं. म्हणून शेतकरी, कष्टकरी, पिचलेल्या समाजाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मी पुढे येत असल्याचं संजीव भोर यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी नाव न घेता युतीचे उमेदवार सुजय विखे आणि आघाडीचे संग्राम जगताप यांच्यावर हल्लाबोल केला. युती आणि आघाडीचे दोन्ही उमेदवार हे धनदांडदे आणि प्रस्थापित आहेत. घराणेशाहीचे वारसदार आहेत. अनेक वर्षांपासून यांच्याच घरात सत्ता आहे, राजकीय पदे आहेत. मात्र सर्व सामान्य समाजाला आणि शेतकऱ्यांना हे लोक न्याय देऊ शकले नाही, असा घणाघात संजीव भोर यांनी केला.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरण आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संजीव भोर राज्याला परिचित झाले. लाखोंच्या संख्येत मराठा समाजाच्या प्रश्नासाठी 50 पेक्षा जास्त मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्च्याचे संजीव भोर समन्वयक आहेत. आता भोर निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे अहमदनगर येथे मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीचा मुद्दा होणार, अस चित्र आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement