एक्स्प्लोर

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या कारवर हल्ला, मुलगा बचावला; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Sanjay Shirsat Car Attack : आमदार संजय शिरसाटांच्या गाडीवर हल्ला झाला असून पोलिस अज्ञात हल्लेखोराच्या शोधात आहेत. कारमध्ये शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट होते.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडलीय. या गाडीत संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट हे होते. त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती आहे. अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला असून पोलिस त्याचा तपास करत आहेत. मतदानाला अवघा काहीच वेळ राहिला असताना ही घटना घडली आहे.

सिद्धांत शिरसाट हे घरी जात असताना हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हा हल्ला गाडीच्या मागून झाल्याचं दिसतंय. या हल्ल्यात सिद्धांत शिरसाट मात्र सुखरूप आहेत. या प्रकरणी संजय शिरसाट आता कुणाला लक्ष्य करतात हे पाहावं लागेल. 

मतांसाठी पैसे वाटप होत असल्याचा व्हिडीओ शेअर

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपांमुळं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात एका मतासाठी मतदाराला विशिष्ट रकमेचं वाटप करण्यात येत असल्याचा व्हिडीओ दानवे यांनी एक्सवर पोस्ट केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मतासाठी आधी एक हजार रुपये देऊन आधार आणि मतदान कार्डस जमा करून घेण्यात येत होती. मतदानाच्या दिवशी त्यांना बोटाला शाई लावून मतदान कार्ड आणि पाचशे रुपये घेऊन जायचे असा प्रकार असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जवाहरनगर पोलीस स्थानकात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याशी संबंधित एका व्यक्तीकडून देवळाई तांडा येथे हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

संजय शिरसाटांनी आरोप फेटाळले

पराभव जवळ दिसू लागल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप विरोधक करत आहेत असं सांगत संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा केल्याचे आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळले आहेत. 

संजय शिरसाट मनोज जरांगेंच्या भेटीला

कालीचरण महाराजांनी मनोज जरांगेंना शिवीगाळ केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय शिरसाट हे मनोज जरांगेंच्या भेटीला गेले. कालीचरण महाराजांचा आणि आपला काही संंबंध नाही असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. मतदानाच्या आधी ही भेट महत्त्वाची मानले जाते. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar : अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील
Rohit Pawar on Ashish Shelar : पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलारांची हिट विकेट
Rohit Pawar Interview : Ajit Pawar यांना कुणी घेरलंय? खळबळजनक नावं फोडली, रोहित पवार Exclusive
Rohit Pawar on Election Commission : निवडणूक आयोग म्हणजे BJP ची एक्स्ट्रा बॉडी
Rohit Pawar on Jay Pawar : जय पवार निवडणूक लढवणार? बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
Rohit Pawar VIDEO : अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय
राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Embed widget