एक्स्प्लोर

'मोदींसारख्या तपस्वी, ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळाल्या पाहिजे', संजय राऊतांचा टीकेचा बाण

मोदींनी एवढे मोठे ध्यान, साधना, तपस्या केली. त्याप्रमाणे 360 आणि 370 जागा काहीच नाहीत. मोदींसारख्या तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा तरी मिळाल्या पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले.

मुंबई : काल लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) मतदान संपताच विविध माध्यमांतून एक्झिट पोल (Exit Poll 2024) जाहीर करण्यात आहे. यात देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यानधारणा सुरू केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

संजय राऊत म्हणाले की, एक्झिट पोलमध्ये सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील. कारण मोदींनी एवढे मोठे ध्यान केले आहे. मोदींनी साधना केली, तपस्या केली. त्याप्रमाणे 360 आणि 370 जागा काहीच नाहीत. मोदींसारख्या तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा तरी मिळाल्या पाहिजे. तरच ते ध्यान मार्गी लागले, टीका त्यांनी केली. 

ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही

ते पुढे म्हणाले की, अत्यंत फसवणुकीचा हा एक्झिट पोल आहे. गेल्या काही वर्षात ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल चुकीचे ठरत आहेत. भारतीय जनता पक्ष, गृह मंत्रालय आणि यंत्रणा कशा प्रकारे प्रभाव टाकत आहे हे सर्वांना माहिती आहे. काल जयराम रमेश यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की, गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या 24 तासात किमान 180 जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून जवळजवळ धमकावले आहे. जर तुम्हाला जिंकण्याची खात्री असेल तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाही. धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 प्लस जागा जिंकणार

इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार आहे. 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे. मला माहीत आहे की महाराष्ट्रात काय होणार आणि देशात काय होणार आहे. कोणी कितीही आकडे लावोत. या देशात एक्झिट पोल बनवणाऱ्या 100 कंपन्या आहेत. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही.  महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 प्लस जागा मिळवेल.  

बारामतीमध्ये सुप्रिया सुळेच जिंकणार 

गेल्या काही दिवस मी ऐकत होतो की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडणुकीत परभूत होतील. मात्र त्या किमान दीड लाख मताधिक्याने जिंकतील. शिवसेनेचा 18 जागांचा आकडा कायम राहणार आहे. काँग्रेसचा सर्वोत्तम कामगिरी राहणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी 35 ते 40 जिंकेल. बिहारमध्ये आरजेडी 18 जागा जिंकणार आहे. माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही. मला तपस्येतून जो आकडा दिसेल तो सांगावा लागेल. आम्ही किमान 30 ते 35 जागा जिंकत आहोत. त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा

Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget