एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रज्ञा सिंह म्हणतात.. तुम्हाला 15-20 पुरुष बेल्टने मारत असतील, निर्वस्त्र करुन उलटं टांगत असतील तर काय कराल?
दहशतवाद्यांच्या गोळीने जे मृत पावतात त्यांना शहीद दर्जा मिळतो. मी माफी मागितली आहे. मला 9 वर्ष प्रताडित करणाऱ्या लोकांकडून तुम्ही माफी मागवू शकता का? असा सवालही त्यांनी केला.
भोपाळ : मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षासह भाजपमधील नेत्यांनीही साध्वी प्रज्ञांच्या या विधानावर आक्षेप घेत टीका केली आहे.
चोहीबाजूने टीका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली असली तरी त्या मात्र त्यांच्यावरच अन्याय झाला असल्याचे सांगत आहेत. जर तुम्हाला 15-20 पुरूष बेल्टने मारहाण करत असतील आणि निर्वस्त्र करून उलटं टांगून ठेवत असतील तर तुम्ही काय करणार? असा सवाल साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला आहे.
प्रज्ञा सिंह यांना एका महिला पत्रकाराने याविषयी प्रश्न केला असता त्यावर उलट प्रश्न करत साध्वी म्हणाल्या की, तुम्ही स्त्री आहात. जर तुम्हाला 15-20 पुरूष बेल्टने मारत असतील, निर्वस्त्र करून मारत असतील. तर हे कोणत्या कायद्यात मोडतं?
पुढे त्या म्हणाल्या की, दहशतवाद्यांच्या गोळीने जे मृत पावतात त्यांना शहीद दर्जा मिळतो. मी माफी मागितली आहे. मला 9 वर्ष प्रताडित करणाऱ्या लोकांकडून तुम्ही माफी मागवू शकता का? असा सवालही त्यांनी केला.
हेमंत करकरेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर साध्वी प्रज्ञा सिंहचा माफीनामा
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या संतापजनक वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. 'हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला', असं वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञांनी केलं होतं.
गुरुवारी भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञाने 'शहीद हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला', असं विधान केलं होतं. या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर साध्वीने माफी मागितली आहे. "माझ्या वक्तव्याचा देशाचा शत्रूंना फायदा होतोय असं मला वाटत आहे. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेऊन माफी मागते", असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने म्हटले आहे.
भोपाळमधून काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंहला उमेदवारी
भाजपने मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने बुधवारी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेच उमेदवारी जाहीर झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement