एक्स्प्लोर

Sadabhau Khot: पवार म्हणतात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय; सदाभाऊ म्हणाले, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?

Sadabhau Khot On Sharad Pawar: सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sadabhau Khot On Sharad Pawar: महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार आहे. जत विधानसभामधील विजय मोठा असणार आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना माणूस विधानसभामध्ये  पाठवायचा आहे. विरोधक कुंभकर्णच्या अवस्थेत गेला पाहिजे, असा गोपीचंद पडळकर यांचा विजय करा, असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले. तसेच यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. जत विधानसभेतील भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ आज महायुतीकडून जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी सदाभाऊ खोत बोलत होते. 

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

शरद पवार असतील उद्धव ठाकरे असते, काँग्रेसवाले असतील यांनी देवेंद्र फडणवीसांना का घेरायला लागली आहेत माहीतय का?, कारण आपण शेतकरी माणसं आहोत. आपल्या घरात गाय असते. राज्याची तिजोरी म्हणजे ही गाय आहे. गायीची जी कास आहे, त्या कासला चार थानं आहे, यामधील अर्धथानं वासऱ्याला पाजायचं (म्हणजे आपल्याला) आणि साडेतीन थानातलं दूध आपणचं हाणायचं. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले ही चारही थानं मी वासरांनाच देणार...यानंतर शरद पवारांना नववा महिना लागला...पवारसाहेब म्हणाले, आता माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार?, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?; सदाभाऊ खोत यांचा सवाल

शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे...मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा...महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. तसेच गावातील नागिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे कोणी काम केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी...असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गोपीचंद पडळकर म्हणजे महाराष्ट्रची मुलूख मैदान तोफ आहे. बाकीच्या लोकांकरता हा जत मतदारसंघ शेवटचा असेल, पण माझ्यासाठी हा एक नंबरचा मतदार संघ आहे. जत विधानसभा हा महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहेच पण माझा गोपीचंद या जतमधून विधानसभा लढवत आहेत. गोपीचंद पडळकरांना या निवडणुकीत निवडून द्या...जतचा विकास करून जत एक नंबरवर नेतो, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं. काही लोकांनी जतचा दुष्काळ पुसण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. जत तालुक्यातील 64 गावातील दुष्काळ आपण नेहमीसाठी भूतकाळ करायचं ठरवलं आहे. या गावांमध्ये बागायती शेती लवकरच होईल. मी मुख्यमंत्री होणे अगोदर या सिंचन योजना बंद होत्या. टेंभू उपसा सिंचन योजनाला 7 हजार 370 कोटी रुपये आपण दिले. यामुळे सांगली जिल्ह्यात दोन लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली. उपसा सिंचन योजनांना सौर ऊर्जा देण्याचा आता निर्णय घेतलाय. त्यामुळे विज बिल भरावे लागणार नाही , याचा पहिला प्रयोग म्हैसाळ योजनेवर केलाय, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल, Video:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget