एक्स्प्लोर

मी ईशान्य मुंबईतून लढावं असं शिवसेनेला वाटतं, मात्र भाजपला वाटत नाही : रामदास आठवले

भाजपला वाटतं मी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी तर शिवसेनेला वाटतं मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी. मात्र या दोन्ही जागांपैकी एक जागा तरी रिपब्लिकन पक्षाला मिळावी, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. घाटकोपर पूर्व कामराज नगर येथे आयोजित सभेत आठवले बोलत होते.

मुंबई : मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी, अशी येथील जनतेची भावना आहे. शिवसेनेलाही असं वाटत आहे, मात्र ज्यांना वाटावं त्या भाजपला मी ईशान्य मुंबईतून लढावं असं अजून वाटत नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. भाजपला वाटतं मी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी तर शिवसेनेला वाटतं मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी. मात्र या दोन्ही जागांपैकी एक जागा तरी रिपब्लिकन पक्षाला मिळावी, अशी अपेक्षा  आठवले यांनी व्यक्त केली. घाटकोपर पूर्व कामराज नगर येथे आयोजित सभेत आठवले बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर देखील टीका केली. कामराज नगर मधील जनता विकास कामांपासून वंचित आहे. त्यांच्या प्रश्नांकडे स्थानिक खासदार किरीट सोमय्या लक्ष देत नाहीत. पाच वर्षांत आमचा खासदार आम्हाला दिसलाच नाही, अशी नाराजी  शिवसेना नगरसेवक परमेश्वर कदम यांनी माझ्याकडे व्यक्त केली, असे आठवले म्हणाले. आठवले म्हणाले की, इथे शिवसेना-भाजप असा वाद करू नका. आता शिवसेना-भाजप युती झाली आहे. आम्ही शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांच्या युती सोबत आहोत. आम्हाला लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांनी प्रत्येकी एक जागा सोडली पाहिजे. शिवसेना नगरसेवकांना आणि  ईशान्य मुंबईतील अनेक कार्यकर्त्यांना मी ईशान्य मुंबईतून  लोकसभा निवडणूक लढावी असे वाटते मात्र ज्यांना ( भाजपला) असं वाटायला पाहिजे त्यांना अजून वाटत नाही अशी खंत आठवले यांनी बोलून दाखवली. दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई दोन्हीपैकी कोणत्याही मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढण्याची आपली तयारी आहे. एकही मतदार संघ रिपाइंला नाही सुटला तरी मी राज्यसभेवर आहे, असे ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारचाच विजय होणार असून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मला केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद निश्चित मिळेल असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget