एक्स्प्लोर

Ram Kadam : डॅशिंग आमदार राम कदमांचा जीव भांड्यात पडला, काशीयात्रेचं पुण्य कामाला आलं, लाडक्या बहिणींच्या मायेने तारलं?

Ram Kadam : राम कदम यांना घाटकोपर पश्चिममधूनच उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांचं तिकीट कापलं जाणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.

मुंबई: भाजपने विधानसभा निवडणुकीसाठीच्या 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये मुंबईतील 14 उमेदवारांचा समावेश आहे. ही उमेदवारी प्रसिद्ध होण्यापूर्वी मुंबईतील 5 आमदारांना खराब कामगिरीमुळे डच्चू मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. यामध्ये घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांचाही समावेश होता. राम कदम यांचा पत्ता कट होणार या बातमीने मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, रविवारी जाहीर झालेल्या उमेदवारी यादीत (BJP Candidate List) नाव दिसताच राम कदम यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला.

राम कदम हे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून (Ghatkoper West constituency) 2009 मध्ये मनसेच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडून आले होते. पहिल्याच टर्ममध्ये राम कदम यांनी 'डॅशिंग आमदार', 'दयावान आमदार' अशी प्रतिमानिर्मिती करायला सुरुवात केली. राम कदम यांचे लक्षवेधी पोस्टर्स कायमच चर्चेचा विषय ठरायचे. 2009 मध्ये घाटकोपरमध्ये त्यांनी आयोजित केलेला दहीहंडी उत्सव आणि त्यासाठी केलेली जोरदार बॅनरबाजीला राज ठाकरे यांच्या करिष्म्याची साथ लाभल्याने राम कदम नवखे असूनही निवडून आले होते. मात्र, 2014 साली राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कार्यक्रमांमुळे कायमच चर्चेत

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राम कदम यांनी 'डॅशिंग आमदार', 'दयावान आमदार' या आपल्या प्रतिमेला साजेसे असे उपक्रम मतदारसंघात राबवले. कीर्तन, श्रावणबाळ पुरस्कार, शालेय विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टर राईड अशा विविध उपक्रमांमुळे ते कायमच चर्चेत राहिले. त्यांचा दहीहंडी उत्सव हादेखील मुंबईतील गोविंदा मंडळाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आला आहे. या सगळ्याला राम कदम यांनी धार्मिक राजकारण आणि आक्रमक हिंदुत्त्वाची जोड दिली होती.

आक्रमक हिंदुत्त्वाचे राजकारण अंगिकारले

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआची सत्ता आल्यानंतर राम कदम यांनी आक्रमक हिंदुत्त्वाचे राजकारण अंगिकारले. भाजपच्या आक्रमक प्रवक्त्यांपैकी एक म्हणून त्यांचा लौकिक वाढू लागला होता. यासोबत राम कदम यांच्याकडून मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या काशी यात्रा हा कायमच चर्चेचा विषय ठरत आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम कदम यांनी 'केदारनाथ यात्रा' आणि 'अयोध्या यात्रा' काढून हिंदुत्त्वाचा मुद्दा आणखी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

लाडक्या बहि‍णींना साडीवाटप

याशिवाय, राम कदम यांच्याकडून आयोजित करण्यात येणारा रक्षाबंधन सोहळाही चर्चेचा विषय ठरत आला आहे. राम कदम यांना राखी बांधण्याचा उत्सव दोन-तीन दिवस चालतो. त्यानंतर राम कदम यांच्याकडून लाडक्या बहि‍णींना साडीवाटप केले जाते. यासाठी महिला मोठ्या संख्येने गर्दी करतात. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन भाजप नेतृत्त्वाने अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर असूनही राम कदम यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला, असे म्हणावे लागेल.

लोकसभेला राम कदमांच्याच मतदारसंघातून भाजपला फटका

दरम्यान लोकसभा निवडणुकांमध्ये ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा हे भाजपकडून रिंगणात होते. पण भाजपच्या या उमेदवाराला राम कदम यांच्याच मतदारसंघात फटका बसला. राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून मिहिर कोटेचा यांना  63 हजार 3370 मतं मिळाली होती. त्याचप्रमाणे याच मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना 79 हजार 142 मत मिळाली. त्यामुळे राम कदम यांच्या विधानसभेच्या तिकीटावरही मागच्या काळात प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं. 

राम कदम पुन्हा एकदा रिंगणात

पण आता हे चित्र स्पष्ट झालं असून राम कदमच घाटकोपर पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.  राम कदम हे पहिल्यांदा 2009 साली राज ठाकरे यांच्या मनसेकडून निवडणूक लढवून विधानसभेवर आमदार म्हणून गेले होते. त्यांनंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपचं कमळ हाती घेतलं. 2014 आणि 2019 मध्ये राम कदम अगदी सहजपणे निवडून आले होते. पण 2024 ची निवडणूक ही राम कदमांसाठी फारशी सोप्पी नसल्याचा अंदाज लोकसभेच्या निकालावरुन वर्तवला जातोय. आता हा अंदाज खरा ठरणार की राम कदम त्यांचा किल्ला राखण्यात यशस्वी होणार याची उत्सुकता आहे. 

ही बातमी वाचा : 

मुंबईत मविआचा अनपेक्षित डाव? वर्सोवा किंवा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात हा उमेदवार रिंगणात उतरवणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Embed widget