(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajya Sabha Election: राज्यसभेच्या 13 जागांसाठी 31 मार्च रोजी मतदान; जाणून घ्या कुणाकुणाचा कार्यकाळ संपणार
Rajya Sabha Election Latest Updates : राज्यसभेच्या 13 जागांसाठी 31 मार्च रोजी मतदान होणार आहे. पंजाबसह अन्य पाच राज्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे.
Rajya Sabha Election Latest Updates : राज्यसभेच्या 13 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जारी करण्यात आला आहे. राज्यसभेच्या 13 जागांसाठी 31 मार्च रोजी मतदान होणार आहे. एकूण सहा राज्यांमध्ये राज्यसभेच्या या 13 जागांसाठी निवडणुका होतील. यात आसाम (Assam) (2 जागा), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) (1), केरल Kerala (3), नागालँड Nagaland(01), त्रिपुरा Tripura (01) तर पंजाबमधील Punjab 5 जागांचा समावेश आहे. आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, नागालँड आणि त्रिपुरामधून राज्यसभेच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिल रोजी तर पंजाबमधील पाच सदस्यांचा कार्यकाळ 9 एप्रिलला पूर्ण होणार आहे.
आसाममधून राणी नराह, रिपुन बोरा, हिमाचल प्रदेशमधील आनंद शर्मा, केरळमधील एके अॅंटनी, एमव्ही श्रेयंस कुमार, सोमाप्रसाद के, नागालॅंडमधील के जी केन्ये, त्रिपुरामधील झरना दास तर पंजाबमधील सुखदेव सिंह, प्रताप सिंह बाजवा, नरेश गुजराल, शमशेर सिंह, श्वेत मलिक या सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे.
राज्यसभेमध्ये सदस्यांची संख्या 250 इतकी असते. यापैकी 238 सदस्यांती निवड राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील विधिमंडळं करतात. तर 12 सदस्य राष्ट्रपती नॉमिनेट करतात. राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) 12 लोकांची निवड राज्यसभेवर सदस्य म्हणून करु शकतात.
राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडून दिले जातात.
लोकसभेसाठी सामान्य माणूस मतदान करु शकतो मात्र राज्यसभेसाठी सामान्य लोकांना मतदानाचा अधिकार नसतो. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. राज्यांच्या विधानसभेतील सदस्य राज्यसभेच्या उमेदवारांसाठी मतदान करु शकतात. मात्र इतर सर्व निवडणुकींपेक्षा ही निवडणूक प्रक्रिया खूप वेगळी असते. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. मात्र हे वरिष्ठ सभागृह असून याची सदस्य संख्या लोकसभेपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha