Rajya Sabha Election : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje Chhatrapati)शिवसेना पुरस्कृत उमेदवार असतील अशी माहिती मिळाली आहे. संभाजीराजे यांच्यासमोर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऑफर ठेवली असल्याची माहिती आहे.
![Rajya Sabha Election : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं Rajya Sabha Election 2022 Sambhaji Raje Chhatrapati Shiv Sena sponsored candidate for Rajya Sabha Rajya Sabha Election : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/68fc8dca5a835e2e02969420e78bcae8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुख्यमंत्री आणि संभाजीराजे या दोघांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची सुत्रांनी माहिती दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या या प्रस्तावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती, अशी माहितीही मिळाली होती. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती समोर आली होती. संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करुन कळवतो असे सांगितलं होतं.
काल यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तोच पक्ष पुढे नेईल. मराठा संघटना प्रमुखांचंही काही म्हणणं आहे. संभाजीराजे छत्रपतींचंही काही म्हणणं आहे. तसेच, शिवसेनेचाही मुद्दा आहे. आम्हा सर्वांचं, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की, सहावी जागा शिवसेनेची आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरुन लढेन आणि विजयी होईल. संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश करावा, असं बोललं जात आहे, त्याबाबत विचारल्यावर बोलताना संजय राऊतांनी पुन्हा सहावी जागा ही शिवसेनेचीच असेल, असं म्हटलं. तसेच, संभाजीराजे छत्रपती हे आमचेच आहेत. त्यांचं आमचं एक नातं आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे की, तुम्हाला जर ही निवडणूक लढायची असेल, तर शिवसेनेत या मग त्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. यामध्ये कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut : शिवसेनेकडून चौथ्यांदा राज्यसभेवर जाणार संजय राऊत, नावावर जमा होणार 'हा' विक्रम
संभाजीराजेंनी शिवबंधन बांधून राज्यसभा लढवावी; पहिल्यांदाच शिवसेनेकडून 'ओपन ऑफर'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)