Rajasthan Election Result 2023 Exit Poll : राजस्थानमध्ये काँग्रेसची धाकधूक, भाजप मुसंडी मारण्याची चिन्हं, एबीपी C Voter Exit Poll
Rajasthan Election Result 2023 Exit Poll : जस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Rajasthan Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Rajasthan) बाजी मारणार हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे (Rajasthan Exit Poll 2023) आकडे समोर येण्यास सुरुवात होत आहे.
Rajasthan Election Result 2023 Exit Poll : जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 साठी (Rajasthan Vidhan Sabha Election 2023) 25 नोव्हेंबरला मतदार पार पडलं. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Rajasthan Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Rajasthan) बाजी मारणार हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे (Rajasthan Exit Poll 2023) आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
राजस्थान एक्झिट पोल (Rajasthan Exit Poll ABP C Voter)
- काँग्रेस - 81
- भाजप - 104
- बसपा - 00
- इतर - 14
- एकूण - 199
199 जागांसाठी मतदान
राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा आहेत. एका उमेदवाराच्या निधनामुळे इथे यंदा 199 जागांसाठी मतदान होत आहे. याआधी 2018 मध्ये, 200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून रिंगणात होता. 39.8 टक्के मतांसह 99 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 100 जागांच्या बहुमताच्या आकड्यासाठी काँग्रेसला केवळ एक जागा कमी पडली. तेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप मतांच्या संख्येत अल्प फरकानं मागे पडला होता. काँग्रेसच्या 39.8 टक्के मतांच्या तुलनेत भाजपची मतं 39.3 टक्के होती. तर, निवडणुकीत भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या.
प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदलाची परंपरा (Rajasthan Election Result History)
राजस्थानमध्ये गेली तीन साडे तीन दशकं दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत आली आहे. इथला मतदार एक टर्म भाजपला एक टर्म काँग्रेसला मतदान करत आला आहे. आताही मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. या राज्यातील बड्या नेत्यांसाठी ही निवडणूक अग्नीपरीक्षा ठरणार आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, भाजपच्या वसुंधरा राजे सिंधिया, राज्यवर्धन सिंह राठोड, गोविंद सिंग दोतसारा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने राजस्थानची सत्ता मिळवण्यासाठी जोर लावला आहे. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी उमेदवारांसाठी प्रचार केला.
कन्हैयालाल टेलरच्या हत्येचा मुद्दा
दुसरीकडे गहलोत-पायलट वादाचा फटका काँग्रेसला बसेल या आशेवर सुद्धा भाजपची रणनीती ठरणार आहे. राजस्थानच्या प्रचारात भाजपने हिंदुत्व कार्ड खेळलं. ज्यामध्ये प्रामुख्याने कन्हैयालाल टेलरच्या हत्येचा मुद्दा गाजला. कन्हयालालने नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवलं होतं, त्यामुळे गेल्यावर्षी दोन धर्मवेड्या मुस्लिम तरुणांनी दुकानात घुसून हत्या केली होती.
कन्हैयालाल हत्येवरून राजस्थानमध्ये राजकीय कुरघोडी आणि आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला होता. केवळ पंतप्रधान मोदीच नाही तर देशाचे गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा आणि भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी आपल्या भाषणांमध्ये कन्हैयालाल हत्येचा मुद्दा उपस्थित केला. यात राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही मागे राहिले नाहीत.
मुस्लीम मते निर्णायक
सुरुवातीपासून ते या हत्याकांडासाठी भाजपवर आरोप करत आहेत.राजस्थानातील काही मतदारसंघांमध्ये मुस्लीम मते निर्णायक ठरतात, तिथे ध्रुवीकरणाचा प्रयत्न झालेला दिसतो. तिजारा मतदारसंघ मुस्लीमबहुल असून तिथे भाजपने बाबा बालकनाथ या योगीबाबाला उमेदवारी दिली. दरम्यान शेवटच्या टप्प्यात अनेक जागांवर मतदानाची टक्केवारी राजस्थान विधानसभा निवडणूक पक्षीय बलाबल 2018 (Rajasthan Election result 2023) वाढली आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा निकाल धक्कादायक असू शकतो.
राजस्थान विधानसभा निवडणूक पक्षीय बलाबल 2018 (Rajasthan Election result 2018)
- भाजप (BJP) - 100
- काँग्रेस (Congress) - 73
- बसपा - 6
- इतर - 21
- एकूण 200
Party = Result
INC+ 100
BJP 73
BSP 6
OTH 21
संबंधित बातम्या