एक्स्प्लोर

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी पायलट की गेहलोत?

मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असणारे सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांची नेमकी काय बलस्थानं आहेत, आणि कुठल्या गोष्टी त्यांच्या विरोधात जाऊ शकतात यावर एक नजर

जयपूर : राजस्थानची लढाई तर काँग्रेसने जिंकली, पण या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाला बहाल करायची हा पेच काँग्रेसला सोडवावा लागणार आहे. सचिन पायलट की अशोक गेहलोत? हायकमांड नेमकं कुणाच्या बाजूने आपला कौल देणार याची उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असणाऱ्या या उमेदवारांची नेमकी काय बलस्थानं आहेत, आणि कुठल्या गोष्टी त्यांच्या विरोधात जाऊ शकतात यावर एक नजर टाकुयात. सचिन पायलट 42 वर्षांचे सचिन पायलट हे 2014 सालापासून म्हणजे जवळपास गेली चार वर्षे राजस्थानमधे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सचिन पायलट हे काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे पुत्र आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. 2004 साली वयाच्या अवघ्या 26 वर्षी ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. 2009 ला त्यांनी अजमेरमधून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र 2014 ला ते याच मतदारसंघातून पराभूत झाले. राजस्थानमध्ये पक्षाच्या दारुण पराभवानंतर पक्षबांधणीचं काम ते गेल्या काही वर्षापासून मेहनतीने करत आहेत. सचिन पायलट हे जम्मू काश्मिरमधले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचे जावई आहेत. 2004 साली त्यांनी अब्दुल्ला यांची कन्या सारा हिच्याशी विवाह केला. वडील पायलट असल्याने त्यांचं बरंचसं शिक्षण राजस्थानच्या बाहेरच झालं. दिल्लीतल्या सेंट स्टीफन्स कॉलेजचे ते पदवीधर आहेत. नंतर अमेरिकेच्या पेनिसेल्विया विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. सचिन पायलट यांच्याबद्दलची एक खास बाब म्हणजे ते देशातले पहिले केंद्रीय मंत्री आहेत, ज्यांनी भारतीय प्रादेशिक सेनेत ( terroterial army) सहभाग घेतला आहे. वय कमी असल्याने सचिन पायलट यांच्याकडे सळसळती ऊर्जा आहे. पण सध्या राजस्थानमध्ये पक्षाला जागा अगदी काठावरच्या मिळाल्या आहेत. त्यामुळे ही कसरत करत सरकार सांभाळणं हे पोराटोरांचं काम नाही. त्याला अनुभवी नेतेच हवेत, अशा टिपिकल काँग्रेसी प्रतिक्रिया पक्षाच्या गोटातून येऊ लागल्या आहेत. शिवाय गहलोत यांच्याकडे सध्या संघटनेच्या महासचिवपदाची जबाबदारी असली तरी राज्यातले अनेक आमदार त्यांनी राजस्थानातच काम करावं या मताचे आहेत. मुख्यमंत्रीपदाचा मान, तोरा हा संघटनेतल्या कुठल्याही पदापेक्षा अधिक असल्यानं गहलोतही ही संधी चाचपून पाहत आहेतच. अशोक गहलोत 68 वर्षांचे गहलोत हे दोनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पहिल्यांदा 1998 ते 2003 आणि नंतर 2008 ते 2013 अशा दोन टर्म त्यांनी पूर्ण केल्या आहेत. राजस्थानातल्या जोधपूरमधला त्यांचा जन्म. विज्ञान आणि कायदा अशा दोन्ही विषयांची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात एमए केलं. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन अगदी तरुण वयातच ते राजकीय क्षेत्रात पडले होते. गहलोत यांच्यातली क्षमता पहिल्यांदा ओळखली ती इंदिरा गांधी यांनी. 1971 च्या काळात गहलोत बांग्लादेशातल्या रेफ्युजींचा प्रश्न ऐरणीवर असताना तिथल्या रेफ्युजी कॉलनीत काम करण्यासाठी सीमेवर गेले होते. तेव्हाच इंदिरा गांधींनी त्यांच्यातली सचोटी, काम करण्याची तडफ ओळखली. त्यांना तेव्हा काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचं राज्य अध्यक्षपदही देण्यात आलं. त्यानंतर आजतागायत गहलोतांनी पक्षासाठी वेगवेगळ्या पदांवर काम केलं आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर काँग्रेसमध्ये जे राहुल पर्व सुरु झालं, त्यातले सर्वात विश्वासू सहकारी म्हणून गहलोतांकडे पाहिलं जातं. पक्षाच्या संघटनेतलं अध्यक्षपदानंतरच सर्वात महत्त्वाचं असलेलं महासचिव हे पद गहलोतांना दिलं गेलं आहे. राहुल यांच्यासाठी प्रश्न असेल की गहलोतांना राष्ट्रीय जबाबदारीतून मोकळं करुन राज्यात जाऊ द्यायचं की नाही. गहलोत हे राजस्थानातले मास लीडर असल्याने आमदारांमध्ये लोकप्रिय आहेत, यात शंका नाही. फक्त आता पायलट यांच्या सळसळत्या रक्ताला कौल द्यायचा की गहलोतांच्या अनुभवाला, ज्येष्ठतेला प्राध्यान्य द्यायचं याचा विचार राहुल गांधींना करावा लागणार आहे. राजस्थानमध्ये कालच्या विजयानंतर तातडीने मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काल विजयानंतर प्रभारी अविनाश पांडे, वेणूगोपाल यांनी जी एकत्रित पत्रकार परिषद घेतली, त्यातच त्याची झलक पाहायला मिळाली. कारण दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापल्या नेत्याच्या घोषणा देत होते. आज आमदारांच्या बैठकीत निरीक्षक प्रत्येकाची मतं खासगीत जाणून घेणार आहेत. त्यानंतर हा कौल हायकमांडला कळवून राजस्थानच्या नेतृत्वाबद्दल पुन्हा दिल्लीत बैठक होणार आहे. त्याच बैठकीत गहलोत की पायलट या प्रश्नाचा फैसला होणार आहे. राजस्थानमधील पक्षीय बलाबल (199) काँग्रेस 99 भाजप 73 बसप 6 माकप 2 इतर 6 अपक्ष 13
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'

व्हिडीओ

Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sushma Andhare PC : ड्रग्ज प्रकरणी अंधारेंचा गौप्यस्फोट, प्रकाश शिंदेंवर आरोप; स्फोटक पत्रकार परिषद
Pradnya Satav BJP : प्रज्ञा सातव यांचं दणदणीत भाषण, भाजपमध्ये प्रवेश का? सगळं सांगितलं..
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
Embed widget