एक्स्प्लोर

Raj Thackeray : माझ्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही : राज ठाकरे

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Raj Thackeray, अमरावती : "धर्मांध मुसलमानांच्या धांगडधिंग्याच्या विरोधात आवाज उठवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मी आवाज दिला आणि ते बंद करून घेतले. हे केलं म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर 17000 केसेस टाकल्या, आणि त्यावेळेस सरकार कोणाचं होतं तर उद्धव ठाकरे-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच. माहीममध्ये एक मझार होती ती अनधिकृत होती, ती आम्ही पाडायला लावली. माझा आज तुम्हाला शब्द देतो, माझ्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. अमरावती विधानसभेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी अमरावती येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

राज ठाकरे म्हणाले,  आपण मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून कधी विचार करणार आहोत का नाही ? हिंदू फक्त दंगलीत एकत्र असतो बाकीच्या वेळेस तो हिंदू नसतो. आणि हेच बाहेरच्यांना हवं आहे. मी एक क्लिप पाहिली आज, एक मुसलमान मौलवी मशिदीतून फतवा काढतो की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक गठ्ठा मतदान करा असे फतवे निघत आहेत. लोकसभेला पण हेच घडलं. मग हिंदू का विखुरलेले ? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. 

इम्तियाज जलीलने हजारो मुसलमानांचा मोर्चा मुंबईत आणला, ही हिंमत का झाली ? कारण काँग्रेस-शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस- उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आलेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती केल्यावर स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाच्या मागची 'हिंदुहृदय' सम्राट ही उपाधी काढली. नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी रस्त्यावर उतरून बीभत्स आंनद व्यक्त केला. मागे एकदा अमरावतीत दंगल झाली तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्व हिंदू परिषद यांनी दंगेखोर मुसलमानांना सडकून काढलं होतं. कितीवेळ बाहेर उभं राहून करायचं, माझ्या हाती सत्ता द्या, एकेकाला चांगला सडकून काढायचा, असंही राज ठाकरे म्हणाले. 

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, अमरावतीला आलं की मला घरी आल्यासारखं वाटतं. 1989 साली प्रत्यक्ष राजकारणात आलो, जन्म राजकीय घरात झाला होता. पुढे राजकीय व्यंगचित्रकार झालो आणि 1989 साली विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाला. 1993 साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांचा मोर्चा काढला होता. 1989 ते 1995 हा काळ माझा मराठवाडा आणि विदर्भात गेला. त्यातल्या त्यात विदर्भात सगळ्यात जास्त काळ अमरावतीत राहिलो. 1988-89 ला माझे मित्र विजय राऊत यांच्या घरी जात असे. तेव्हाच अमरावती सुंदर होतं. माझ्या आजीचं माहेर अमरावती. अमरावतींबद्दल मला पहिल्यापासून एक आस्था आहे. पण आज हे शहर जसं आकारहीन होत गेलं ते पाहून वाईट वाटतं. 

आज विदर्भातील तरुण-तरुणी शिक्षण,नोकरीसाठी विदर्भात न राहता पुणे-मुंबईत जातात. याला विकास म्हणायचं ? तुम्हाला तुमच्या शहरात चांगलं शिक्षण मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत याला काय अर्थ आहे ? मग तुम्हाला पिढ्यानपिढ्या विकासाचं स्वप्न दाखवलं गेलं त्याचं काय झालं ? तुमचे आमदारकीचे उमेदवार पण पक्ष बदलून इकडून तिकडे गेले, हे का होतं कारण तुम्ही त्यांना जाब विचारत नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले. 

हिंदू एकत्र येऊ नये म्हणून शरद पवार नामक संताने महाराष्ट्रात जातीजातीत विष पेरलं. जेम्स लेन प्रकरणात महाराजांच्याबद्दल काही वेडीवाकडी वाक्य होती, ते पुस्तक कोणी वाचलं होतं ? त्यावर बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहंदळें यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या मजकुरावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पवारांनी भांडारकर संस्थेवर आरोप करवून घेतला की याच संस्थेनेच म्हणे ही चुकीची माहीती दिली. आणि पुढे बाबासाहेब पुरंदरेंवर आरोप करून शरद पवारांनी आधी ब्राह्मण-मराठा वाद भडकवला आणि पुढे मराठा-ओबीसी वाद पेटवला. तुम्ही मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून एकत्र येऊ नये ही पवारांची इच्छा आहे. 

यवतमाळ असू दे किंवा इतर अनेक जिल्हे हे आज कशासाठी ओळखले जातात तर कधी आत्महत्या करणाऱ्यांचा जिल्हा तर एखादा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. याला काय अर्थ आहे ? कुठे गेला मग इतक्या वर्षांचा विकास. माझा जाहीरनामा पुढच्या 4,5 दिवसांत येईल त्यात मी तीच आश्वासनं देईन जी पूर्ण होतील. मध्यंतरी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचं स्वप्न दाखवलं गेलं. मुळात हा पुतळा उभा राहणं शक्य नाही. पण जरी तो झाला त्याच्यासाठी 15 ते 20 हजार कोटींचा खर्च येईल. इतका पैसा पुतळ्यांवर खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून महाराजांनी उभारलेल्या गड-किल्ल्यांचं संवर्धन करा. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं खरं स्मारक म्हणजे जगातील सगळ्यात मोठी लायब्ररी उभी करण असेल. अहो ही जगातील सगळ्यात मोठी लायब्ररी हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली नाही का ? असा सवालही राज ठाकरे म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget