Video: अमित ठाकरेंसाठी माहीमच का निवडला; मनसे अध्यक्षांनी सांगितली 'राज की बात'
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यंदा 'एकला चलो रे'चा नारा देत विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत
मुंबई : महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी काही खास असलेल्या काही लढतींमध्ये मुंबईतील ठाकरे बंधुंच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, गत निवडणुकीत मैदानात उतरत आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड जिंकली होती. त्यानंतर, यंदा प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि दुसरे ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. अमित ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, राज्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष अमित ठाकरेंच्या लढतीकडे लागले आहे. त्यातच, येथील मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर मैदानात आहेत. तर, महाविकास आघाडीकडून ठाकरेच्या महेश सावंत यांचे आव्हान अमित ठाकरेंना असणार आहे. त्यामुळे, येथील लढत चुरशीची मानली जाते. त्यातच, राज ठाकरेंनी महाराष्ट्र व्हीजन कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे माहीत विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक का लढवत आहेत, यामागील राजकारण सांगितलं.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यंदा 'एकला चलो रे'चा नारा देत विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये, राजपुत्र म्हणजेच अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आलं आहे. आता, अमित ठाकरेंना माहीम विधानसभा मतदारसंघातूनच विधानसभेच्या रिंगणात का उतरवले, याचं उत्तर स्वत: राज ठाकरे यांनीच दिलं आहे. माहीमच का निवडले?, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, नेत्यांची बैठक झाली, अमित म्हणाला, पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावं, मी सुद्धा लढेन. मी अमितला म्हणालो, तू सिरियस आहेस, तो म्हणाला पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावे , मी सुद्धा लढेन. आधी भांडुप बद्दल चर्चा.. मी म्हणालो भांडुप?, निवडणूक लढणे हे माझे टेम्परामेंट नाही. मी बाळासाहेबांच्या विचाराने वाढलो, अमितला कसं समजावयचे याचा मी विचार करत होतो. अमितने ठरवले आहे, आज उभा केलं नाही, तर उद्या उभा करावाच लागेल, असे म्हणत राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या निवडणूक लढविण्याबाबत माहिती दिली.
मी कौटुंबिक संबंध जपतो
मी कौटुंबिक संबंध जपतो, मी बाळासाहेबांकडे बघून शिकलो, सुप्रिया उभी होती तेव्हा बाळासाहेबांनी मदत केली. मी बाहेर पडलो तेव्हा बाळासाहेबांना विरोधात काहीही बोललो नाही, अजित पवार कायकाय बोलले, असे म्हणत राज ठाकरेंनी कौटुंबिक नातं आणि राजकारण याबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं. दरम्यान, केंद्रीयमंत्री रामदास आठवलें सारखं मंत्री व्हायचे असेल तर त्यापेक्षा पार्टी बंद केलेलं बरं, अशा शब्दात आठवलेंच्या नेतृत्वावर राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. दरम्यान, शिवतीर्थवर झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांना मनसे नेत्यांकडून अमित ठाकरेंना माहीम विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह धरण्यात आला.
हेही वाचा
अमित ठाकरेंना मदत करायला हवी, आमचं ठाम मत; एकनाथ शिंदेंनी...; देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका