एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरे यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सुरु आहेत, विनोद तावडेंची टीका
ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सध्या सुरु आहेत. काल नांदेडला शो झाला आणि लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.
राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वत: कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करीत नाहीत, पण आपल्या जाहीर सभांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून देण्याचे आग्रहाने आवाहन करीत आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत असेही तावडे यांनी स्पष्ट केले. तसेच राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी अशी मागणीही आम्ही करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
राज ठाकरे यांच्या पक्षाचा एक खासदार नाही, एक आमदार पण नाही, उरले सुरलेले नगरेसवक सुध्दा पक्ष सोडून गेले. त्यामुळे स्वत:चा पक्ष संपला असताना दुसऱ्याला संपविण्याची भाषा हे कशी काय करतात असा टोलाही त्यांनी मारला.
भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला त्यांची कागदपत्रे माझ्याकडे असून निवडणुका संपल्यानंतर ती कागदपत्रे दाखवेन असे विधान करणाऱ्या अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, अजित पवार फक्त हूल देत आहेत. अजित पवार हे कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. कबड्डी खेळामध्ये खेळाडूला एखादा गडी बाद करता आला नाही तर तो फक्त मैदानात एंट्री करतो आणि प्रतिस्पर्धी संघाला नुसती हुल मारुन येतो, तसा अजित पवार यांचा फक्त हुल मारण्याचा प्रकार आहे, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement