...म्हणून पीएम नरेंद्र मोदी सिनेमाचं प्रदर्शन थांबवलं : राज ठाकरे
आधीच मोदी आणि त्यांच्या सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय मग कोण जाणार सिनेमा बघायला, अशा शब्दात राज ठाकरेनी पीएम मोदी सिनेमाची खिल्ली उडवली.
सातारा : पीएम नरेंद्र मोदी सिनेमाचं प्रदर्शन निवडणूक आयोगाने थांबललं आहे, यावरही राज ठाकरेंनी वक्तव्य केलं. लोकं सिनेमा बघायला जाणार नाहीत, त्यामुळे चित्रपट पडला तर काय करायचं, या भीतीने चित्रपटाचं प्रदर्शन भाजपनेच थांबवल्याच आरोप राज ठाकरेंनी केला.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह देश संपवतील. हिटलरप्रमाणे हे वागत आहेत. हिटरलही रेडिओवर बोलायचा. हिटलरनेही आपल्या विचारांच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फिचर फिल्म काढल्या होत्या. निवडणुकीच्या तोंडावर तेही पीएम मोदी नावाचा सिनेमा आणत होते. मात्र लोकं सिनेमा पाहायला येणार नाही. सिनेमाला प्रतिसाद मिळाला नाही तर काय करायचं या भीतीने सिनेमाचं प्रदर्शन थांबवल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं.
आधीच मोदी आणि त्यांच्या सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय मग कोण जाणार सिनेमा बघायला, अशा शब्दात राज ठाकरेनी पीएम मोदी सिनेमाची खिल्ली उडवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. चित्रपट 11 एप्रिलला प्रदर्शित केला जाणार होता.
'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित करणे आचारसंहितेचा भंग ठरेल, असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. याप्रकरणी विरोधकांनी या चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे म्हणत विरोधकांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करु नये, असे आदेश दिले.