एक्स्प्लोर
Advertisement
माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय राहत नाही : राज ठाकरे
'गोल्ड मॅन' म्हणून राज्यभरात सुपरिचित असलेले रमेश वांजळे यांचं 10 जून 2011 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.
पुणे : खडकवासल्यात आलो की माझ्या रमेश वांजळे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आमदाराच्या आठवणीने भावूक झाले. पुण्यातील निवडणूक प्रचार सभेत राज ठाकरे बोलत होते. खडकवासलाजवळील मैदानात ही सभा आयोजित करण्यात आली होती.
"खडकवासला भागातून जाताना येताना माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी तुमच्या टाळ्यांसाठी कधीच बोललो नाही. दरवेळेला आम्ही इथून जातो येतो तेव्हा गाडीमध्ये आमची नेहमीच चर्चा होते, की माझा वाघ गेला. आज खरंतर ते असायला हवे होते," असं राज ठाकरे म्हणाले.
कोण आहेत रमेश वांजळे?
- रमेश वांजळे हे खडकवासल्यातील मनसेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले होते.
- सोन्याचे दागिने घालत असल्याने रमेश वांजळे यांची गोल्डमॅ म्हणूनही ओळख होती.
- अबू आझमी यांचा विधानसभेत माईक खेचल्यानंतर ते महाराष्ट्रात अधिक प्रसिद्ध झाले होते.
- रमेश वांजळे यांचा 2011 मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.
- त्यानंतर वांजळे यांच्या पत्नी हर्षदा आणि मुलगी सायली यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
पुणे
बीड
राजकारण
Advertisement