एक्स्प्लोर
Advertisement
रायगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवीशेठ पाटील भाजपमध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रवीशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रायगड जिल्ह्यातील पेणमधील रवी पाटील हे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते
रायगड : रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील हे पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरु होत्या. अखेर, रवी पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रवीशेठ पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
रायगड जिल्ह्यातील पेणमधील रवी पाटील हे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. रवीशेठ पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त पसरताच रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली होती. रवीशेठ पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर यांच्याशी रवीशेठ पाटील यांचे घनिष्ठ संबंध असल्याने भाजपची वाट रवीशेठ पाटील यांना सहज उपलब्ध झाली. रवीशेठ पाटील हे शिवसेनेमध्ये जाणार, अशाही चर्चा होत्या. मात्र त्यांनी भाजपची वाट धरली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधक एकत्र येत असल्याने रायगडातही या महाआघाडीच्या राजकारणाने जोर पकडला.
रायगड जिल्ह्यातील शेकाप आणि काँग्रेस हे एकमेकांचे जुने वैरी. पेणमध्ये शेकाप आणि काँग्रेस हे सातत्याने एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतही शेकाप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले असताना गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र आले आहेत.
पेण, रोहा तालुक्यातील काँग्रेस जवळपास संपुष्टात आली आहे. रवीशेठ पाटील हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही निकटर्वीय म्हणून ओळखले जातात. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी रवीशेठ पाटील यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती. तर, नुकतंच काँग्रेस प्रदेश कमिटीने पेण येथील काँग्रेस कमिटी बरखास्त केल्याने काँग्रेसची भूमिका समोर आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
बीड
क्रिकेट
Advertisement