सत्तेत आल्यास 2020 पर्यंत 22 लाख सरकारी रिक्त जागा भरणार, राहुल गांधींची घोषणा
याआधी राहुल गांधींनी न्याय (NYAY) योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा फायदा देशातील 5 कोटी कुटुंबांना होणार आहे.
नवी दिल्ली : निवडणुका म्हटलं की राजकीय पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडणारच. सत्तेत असलेल्या भाजप आणि सत्तेत येण्यासाठी धडपड करत असलेल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'न्याय' योजनेनंतर आणखी एक मोठं आश्वासन मतदारांनी दिलं आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास रिक्त असलेली 22 लाख सरकारी पदे भरण्यात येतील असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे.
सध्या भारतात तरुण मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहे. बेरोजगारी ही देशातील आजची सर्वात मोठी समस्या आहे, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचं राहुल गांधींनी दाखवलं आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास सध्या रिक्त असलेल्या 22 लाख सरकारी जागा भरण्यात येतील, असं राहुल गांधींनी सांगितलं.
Today, there are 22 Lakh job vacancies in Government.
We will have these vacancies filled by 31st March, 2020. Devolution of funds from the Center to each State Govt for healthcare, education etc. will be linked to these vacant positions being filled. — Rahul Gandhi (@RahulGandhi) March 31, 2019
राहुल गांधींनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "आज 22 लाख सरकारी जागा रिक्त आहेत. या जागा 31 मार्च 2020 पर्यंत भरण्यात येतील. आरोग्य, शिक्षण इत्यादी केंद्र सरकारच्या विविध राज्यातील जागा भरण्यात येतील."
लवकरच काँग्रेसच्या जाहीरनाम्याची घोषणा होणार आहे. यामध्ये 'न्याय' (NYAY)योजनेनंतर शहरी रोजगार गॅरेंटी योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत किमान 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये 4 ते 10 हजार रुपये महिना उत्त्पन्न मिळणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणाही काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.
2019 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरीब कुटुंबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणार, असं राहुल गांधी यांनी जाहीर केलं आहे. याचा थेट फायदा देशातील 5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 25 कोटी जनतेला या योजनेचा लाभ होण्याचा दावा काँग्रेस अध्यक्षांनी केला.
संबंधित बातम्या
राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवणार
सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देणार : राहुल गांधी
काँग्रेस सत्तेत आली तर राहुल गांधी पंतप्रधान होतील : प्रियांका गांधी