Punjab Elections 2022 : हायकमांडला पंजाबमध्ये नेहमी कमकुवत मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायचा असतो : नवज्योत सिंह सिद्धू
पंजाब काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच असल्याचे पाहायला मिलत आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे दोघेही आमने-सामने आले आहेत.
Punjab Assembly Elections 2022: सध्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पंजाबमध्ये चांगलेच राजकीयव वातावरण तापले आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच पंजाब काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Chief Minister Charanjit Singh Channi) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे दोघेही आमने-सामने आले आहेत. दरम्यान, उद्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार आहेत. त्यापूर्वीच सिद्धू यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
रविवारी राहुल गांधी हे पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. 2 वाजता लुधियाना येथे राहुल गांधी पंजाबमधील काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याची घोषणा करणार आहेत. त्यामुळे चन्नी आणि सिद्धू यांच्यासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. यापूर्वीच सिद्धू यांनी काँग्रेस हायकमांडला नाराज करणारे वक्तव्य केले आहे. हायकमांडला नेहमी पंजाबमध्ये कमकुवत मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायचा असतो. जो हायकमांडच्या आदेशावर नाचेल. याबाबत सिद्धू यांच्या नियकटवर्तीयांनी सांगितले की, त्यांनी हे वक्तव्य भाजपच्या संदर्भाने केले होते.
हायकमांड जो निर्णय देईल तो मान्य असेल - सिद्धू
सिद्धू यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाबाबत हायकमांड जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे वक्तव्य केले होते. काँग्रेस हायकमांड अतिशय हुशार आहे. ते जे निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे. दरम्यान, चन्नी यांच्या भाच्याच्या अटकेसंदर्भात सिद्धू यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, जोपर्यंत कोणी दोषी नाही तोपर्यंत त्याला दोषी ठरवता येणार नाही.
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने (Enforcement Directorate) पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांचा भाचा भूपेंद्र सिंह हनी (Bhupendra Singh Honey) याला अवैध खाण प्रकरणात अटक केली. याप्रकरणी भूपेंद्र सिंह हनी यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. हमी यांना न्यायालयाने 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी चन्नी यांचे नाव आघाडीवर
मुख्यमंत्री पदासाठी चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच सिद्धू यांनी हायकमांडबाबत असे वक्तव्य केले आहे. यामुळे सिद्धू नाराज असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे पक्षातही अनेकांना माहित आहे की, मुख्यमंत्री पदासाठी चन्नी यांचे नाव सिद्धू यांच्याआधी आघाडीवर आहे. मात्र, आता उद्या राहुल गांधी नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: