(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Punjab Elections 2022 : पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात विक्रम सिंह मजिठिया लढवणार निवडणूक ; अकाली दलाचा मोठा निर्णय
Punjab Elections 2022 : पंजाबमधील माजी मंत्री विक्रम सिंह मजिठिया दोन जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मजिठिया हे अमृतसर पूर्व मतदारसंघातून काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
Punjab Elections 2022 : आगामी विधानसभा निवडणुकीवरून पंजाबमध्ये सध्या राजकीय हालचाली जोरात आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपल्या निर्णयांनी सर्वांना चकित करत आहेत. आता माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा शिरोमणी अकाली दलाने केली आहे. याशिवाय माजी मंत्री विक्रम सिंह मजिठिया दोन जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मजिठिया हे अमृतसर पूर्व मतदारसंघातून काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखवीर सिंग बादल यांनी बुधवारी अमृतसरमध्ये ही घोषणा केली. अकाली दलाच्या या निर्णयानंतर अमृतसर पूर्व जागेवरील लढत खूपच रंगत बनली आहे. सिद्धू यांनी गेल्या वेळी ही जागा जिंकली होती. विक्रम मजिठिया 2007 पासून मजिठातून निवडणूक लढवत असून त्यांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत. आता अकाली दलाने मजिठिया यांना सिद्धू यांच्या विरोधात उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
मजिठिया यांचा ड्रग्ज प्रकरणी अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला असून, आता त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय उरला आहे. उच्च न्यायालयाने मजिठिया यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मार्च महिन्यात होणाऱ्या मतमोजणीतून पंजाबमध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करणार हे समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Opinion Poll: पाहा सर्वेनुसार कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?
- Opinion Poll: पाहा सर्वेनुसार कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?
- Goa Election : गोव्यात भाजपला बंडखोरीची लागण, पक्षासमोर मोठं आव्हान उभं
- Goa Election : माजी मुख्यमंत्री पार्सेकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार; भाजपकडून तिकीट कापल्यानं नाराज, पक्षालाही रामाराम
- जातींचा विचार केल्यास गोव्यात राजकीय समीकरणं बदलू शकतात का?