Pune Bypoll Election : मे महिना संपत आला तरी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही?
Pune ByPoll Election ;जसा मे महिना संपत येत आहे तशी पुणे पोटनिवडणुकीची शक्यता मावळत चालली आहे. कारण पावसाळ्यात निवडणूक घेण्यास निवडणूक आयोग तयार नसतो आणि पावसाळ्यानंतर सर्वसाधारण निवडणुकीची वेळ जवळ येईल.
Pune Bypoll Election : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll) होणार की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रांची सज्जता, मतदार याद्या अद्ययावत करणे अशी कामे सुरु आहेत. त्याचबरोबर पुण्यात कर्नाटकहून मतदान यंत्रे देखील दाखल झाली आहेत. सर्वसाधारण निवडणुकीच्या तयारीचाही भाग म्हणून याकडे पाहिलं जात आहे. तर दुसरीकडे जसा मे महिना संपत येत आहे तशी पोटनिवडणुकीची शक्यता मावळत चालली आहे. कारण पावसाळ्यात निवडणूक घेण्यास निवडणूक आयोग तयार नसतो आणि पावसाळ्यानंतर सर्वसाधारण निवडणुकीची वेळ जवळ येईल. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे 29 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील 151 (ए) अन्वये लोकसभा अथवा विधानसभेची जागा कोणत्याही कारणाने रिक्त झाल्यास सहा महिन्यांच्या कालावधीत ही जागा भरण्याकरता पोटनिवडणूक घेण्याची तरतूद आहे. परंतु मे महिना संपत आला तरीही पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.
भाजपकडून पाच नावं चर्चेत
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पाच नावं चर्चेत आहेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत. या पाच जणांपैकी भाजप एकाला उमेदवार म्हणून संधी देण्याची शक्यता आहे. या पाचही जणांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक नवीन प्रोजक्ट्स हाती घेतले आहेत. शिवाय त्यांनी पुण्यातील इतर विषयांवरदेखील केंद्रीय स्तरावर नाव कमावलं आहे. त्यामुळे यापैकी भाजप नेमकी कोणाला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही तू तू मैं मैं
दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये देखील ही जागा लढवण्यावरुन तू तू मैं मैं पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्ष कॉंग्रेसकडून लढवण्यावरुन येणारी ही जागा आम्हीच लढवणार असं कॉंग्रेस नेते म्हणत आहे. तर पुणे शहरात आमची ताकद वाढल्याने ही आम्हाला मिळायला हवी, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करताना दिसत आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात आली असून सत्ता न मिळाल्यास ती अस्तित्वात राहणार नाही, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा