एक्स्प्लोर
9 महिने 9 दिवस पूर्ण झालेल्या गर्भवतीने प्रसूतीच्या काही तास आधी मतदानाचा हक्क बजावला
लोकशाहीचा उत्सव सर्वसामान्य जनतेला साजरा करता यावा यासाठी प्रशासन एका बाजूला प्रत्येक भारतीय नागरिकाला जागरूक करण्याचा प्रयत्न करत असताना प्राची यांनी जागृत नागरिकाची भूमिका बजावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

सातारा : मतदान जनजागृतीसाठी अनेक प्रयत्न करून देखील अनेकजण मतदान करत नाहीत. मात्र प्रसूतीला काही तास बाकी असताना एका गर्भवती महिलेने मतदान करून आदर्श मतदार असल्याचे दाखवून दिले आहे. साताऱ्यातील या गर्भवती महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सातारा : प्रसूतीच्या काही तास आधी गर्भवतीने मतदानाचा हक्क बजावला pic.twitter.com/HftZP5qDJc
— ABP माझा (@abpmajhatv) April 23, 2019
साताऱ्यात प्राची घाडगे या गर्भवती महिलेने आज तिसऱ्या टप्प्यात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. प्राची यांचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले असून अवघ्या कहाणी तासात त्यांची प्रसूती होणार आहे. विशेष म्हणजे प्राची यांच्या पतीचे अवघ्या दोन महिन्यापूर्वी निधन झाले आहे. प्राची यांनी थेट दवाखान्यातून येऊन आपल्या मताचा हक्क बजावला.
VIDEO | रुग्णालयात अॅडमिट होण्यापूर्वी 9 महिने 9 दिवस गर्भवतीचं मतदान | सातारा | एबीपी माझा लोकशाहीचा उत्सव सर्वसामान्य जनतेला साजरा करता यावा यासाठी प्रशासन एका बाजूला प्रत्येक भारतीय नागरिकाला जागरूक करण्याचा प्रयत्न करत असताना प्राची यांनी जागृत नागरिकाची भूमिका बजावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
दरम्यान, मतदान करणे हे लोकशाहीतले महत्वाचे कर्तव्य आहे. सर्वानी आपला मताधिकार बजावणे गरजेचे आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मतदानासाठी आल्याचे प्राची यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्राची पुन्हा दवाखान्यात ऍडमिट झाल्या.
VIDEO | लग्नाआधी तरुणीनं बजावला मतदानाचा हक्क | पुणे | एबीपी माझा आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक
निवडणूक




















