विषारी सापाच्या तोंडातून हिरवे फुत्कार मतांच्या लालसेपोटी; दरेकरांची आव्हाडांवर जहरी टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा होता. पण एके दिवशी अजित पवार येतात आणि धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढतात.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आणदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेवरुन राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यावर पलटवार करत आहेत. त्यातच, आता महायुतीमधील (Mahayuti) नेतेही जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल करताना दिसून येतात. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हांडांवर जहरी टीका केलीय. आव्हाडांना पातळी राहिली नाही, ते विकृत राजकीय पुढारी आहेत. विषारी सापाच्या तोंडातून हिरवे फुत्कार मतांच्या लालसेपोटी करत आहेत, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांच्यावर दरेकरांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे, जितेंद्र आव्हाडांविरुद्ध आता महायुती एकवटल्याचं पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा होता. पण एके दिवशी अजित पवार येतात आणि धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढतात. जाताना त्यांच्याकडी घड्याल देखील हिसकावून नेतात. ही चोरांची टोळी आहे अस म्हणत आव्हाडांनी अजित पवारांवर टीका केली. अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. ते सध्या मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यावरुन, आता प्रवीण दरेकर यांनी पलटवार केलाय.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी जहरी टीका केलीय. आव्हाडांना पातळी राहिली नाही, ते विकृत राजकीय पुढारी आहेत. विषारी सापाच्या तोंडातून हिरवे फुतकर मतांच्या लालसेपोटी करत आहेत. एका बाजूला जितेंद्र आव्हाडांनी उभ राहावं, दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी उभ राहावं मग तुलना करावी, अशा शब्दात दरेकर यांनी आव्हाडांच्या टीकेचा समाचार घेतला.
एबी फॉर्म देणे गुन्हा नाही
निवडणूक आयोग त्यांचे काम करतात. एबी फॉर्म हेलिकॉप्टरने पाठवला असेल तर काही गुन्हा नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवलेल्या घटनेचं त्यांनी समर्थन केलं.
मोदींच्या सभांबाबत दरेकर म्हणाले
मोदींच्या सभांचे राजकारण होत असल्याबाबत बोलताना, मोदींना आमंत्रित करणं हा विषय पक्ष पातळीवर होत असतो, असे दरेकर यांनी म्हटले.
माहीममध्ये महायुती म्हणून समोर जाणार
भाजपाने कृतज्ञतेच्या भावनेतून अमित ठाकरेंना पाठिंबा दिला जावा, असे सूतोवाच केले आहे. महायुती म्हणूनच आम्ही समोर जाणार, असल्याचे दरेकर यांनी म्हटले. त्यामुळे, माहीममध्ये अमित ठाकरे देण्यात येत असलेल्या भाजपच्या पाठिंब्यावर दोन मतप्रवाह नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांचे उमेदवार आज जाहीर होत आहेत, त्याबाबत बोलताना, आम्ही पण वाट बघतोय पवार साहेबांसाठी ते पाठिंबा देत आहेत का पाहू, असे दरेकर यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीसांसमोर अनेक प्रश्न
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत करण्यात आलेल्या घोषणेवर त्यांनी भाष्य केलंय. अशीच घोषणा करत राहा. देवेंद्र तुमच्या नादाला लागत नाहीत, त्यांच्यासमोर तुम्ही एकच प्रश्न नाही, असे दरेकर यांनी म्हटले.
अजित पवारच निर्णय घेतील
मानखुर्द- शिवाजी नगर मतदारसंघातून नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, त्याबाबत बोलताना ते अजित पवारांचे उमेदवार आहेत, त्या संदर्भात तेच निर्णय घेतील, असे म्हणत दरेकर यांनी अधिक बोलणे टाळले.