एक्स्प्लोर
काँग्रेस हा गाढवांचा पक्ष, भेटीवरुन गाढवपणा करणार हे वाटलंच होतं, प्रकाश आंबेडकरांची टीका
भेटीचं राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना जमतं, असेही ते म्हणाले. इलेक्शन हे लोक कोणाला निवडून देतात त्यावर अवलंबून असतं, मात्र असे डावपेच करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोक त्यांना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले.
सोलापूर : काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीवरून गाढवपणा करणार हे वाटलंच होतं, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
भेटीचं राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना जमतं, असेही ते म्हणाले. इलेक्शन हे लोक कोणाला निवडून देतात त्यावर अवलंबून असतं, मात्र असे डावपेच करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोक त्यांना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. 'प्रकाश आंबेडकर यांनी सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा दिला' 'वंचितचा काँग्रेसला पाठिंबा' अशा अफवांना उत आला होता. यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी खरमरीत टीका केली आहे. भेटीच राजकारण करणं हे फक्त काँगेसला जमतं आणि राजकारण करणाऱ्यांना लोकं जनता धडा शिकवेल असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
सोलापुरात आंबेडकर आणि शिंदे यांची हॉटेलमध्ये अचानक भेट
बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे या कट्टर प्रतिस्पर्ध्यांची काल सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये अचानक भेट झाली होती. प्रकाश आंबेडकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह नाश्ता करत असताना सुशीलकुमार शिंदेही त्यावेळी बालाजी सरोवर येथे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यास आले होते. प्रकाश आंबेडकर तिथेच बसल्याचं समजल्यावर शिंदेंनी तिथे जाऊन त्यांची भेट घेतली होती. आंबेडकर आणि शिंदे या दोघांनी एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र यावेळी राजकारणाचा विषय झाला नाही, अवघ्या काही मिनिटांचा हा प्रसंग होता असं सांगण्यात आलं होतं.तीन दिवसांपूर्वी सोलापुरात झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच ही भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अकोल्यासह प्रकाश आंबेडकर सोलापूरमध्येही निवडणूक लढवत आहेत. आंबेडकरांच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणी वाढल्याचं म्हटलं जात आहे. प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं शिंदेंनी जाहीर केलं आहे. सोलापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यात प्रमुख लढत आहे. सोलापूरमध्ये 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. EXCLUSIVE | प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त आणि खळबळजनक मुलाखत UNCUT | कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी खास बातचीतअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement