उर्मिला मातोंडकरविरोधात पवई पोलिसात तक्रार, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
भाजप नेते सुरेश नखुवा यांनी केलेल्या तक्रारीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि एका पत्रकाराचंही नाव आहे. उर्मिलाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
मुंबई : अभिनेत्री आणि काँग्रेसची उत्तर मुंबईमधील लोकसभेची उमेदवार उर्मिला मातोंडकरविरोधात भाजपनं पोलिसात तक्रार नोंदवली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भाजप नेते सुरेश नखुआ यांनी उर्मिला मातोंडकरविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र उर्मिलाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
उर्मिलाने एका टीव्ही शोमध्ये हिंदू धर्म हा जगातील सर्वात हिंसक धर्म असल्याचं सांगितल्याचा आरोप सुरेश नखुआ यांनी केला आहे. उर्मिलाच्या असं सांगण्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सुरेश नखुआ यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. नखुवांनी केलेल्या तक्रारीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि एका पत्रकाराचंही नाव आहे.
#Mumbai: BJP's Suresh Nakhua has filed a criminal complaint against Congress's Urmila Matondkar,states,"She has hurt religious sentiments of Hindus by calling 'Hinduism the most violent religion in the world' on a TV show".He also named Congress Pres&a journalist in the complaint
— ANI (@ANI) April 6, 2019
सिनेसृष्टीतील कारकिर्द गाजवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच उर्मिलाने राजकारणात प्रवेश केला आहे. पदार्पणात काँग्रेसने उर्मिलावर विश्वास दाखवत उत्तर मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात उर्मिला निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
विशेष म्हणजे उर्मिला निवडणूक लढवत असलेल्या उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून 2004 साली अभिनेते गोविंदा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी गोविंदा यांनी भाजपचे नेते राम नाईक यांचा पराभव करत संसदेत एन्ट्री केली होती. त्यामुळे उर्मिला यावेळी अशी कमाल करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
लग्नानंतर धर्म बदलला नाही, माझा नवरा मुस्लीम आहे आणि मी हिंदू : उर्मिला मातोंडकर
उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार
देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय, हे सांगणारा भाजप कोण? काँग्रेसवासी उर्मिला मातोंडकरचा सवाल