एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पार्थ पवार-श्रीरंग बारणे, दोन प्रतिस्पर्ध्यांचं एकाच वेळी एकाच मंदिरात साकडं
पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर श्रीरंग बारणे हे मावळमधील शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत.
पुणे : निवडणुका म्हटलं की प्रत्येक उमेदवार विजयासाठी देवाला साकडे घालतात. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव व्हावा ही भावना मनामध्ये नक्कीच असते. पण दोन प्रतिस्पर्धी एकाचवेळी एकाच मंदिरात साकडे घालायला आले तर... मावळ लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याबाबतीत असंच काहीसं घडलं आहे.
देहूत आज तुकाराम बीजनिमित्त वारकरी संप्रदाय जमला आहे. संकटातून मुक्त करण्यासाठी हे वारकरी तुकोबांच्या चरणी माथ टेकवत आहेत. तिथेच पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी एकत्रित येत लोकसभेत यश मिळावं म्हणून साकडं घातलं. आता तुकोबा कोणाला प्रसन्न होतील हाच प्रश्न अखंड वारकरी संप्रदायाला यानिमित्ताने पडला आहे.
पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर श्रीरंग बारणे हे मावळमधील शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत.
संबंधित बातम्या
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
क्रीडा
राजकारण
Advertisement