एक्स्प्लोर

पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंपरा

एरंडोल-पारोळा मतदारसंघ हा जळगावातील एक मतदारसंघ. महत्वाचा अशासाठी कायम विरोधी आमदार देणं ही या मतदारसंघाची परंपरा, 2014 च्या मोदी लाटेत या एकमेव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. आताही राष्ट्रवादीचे एकमेव आमदार डॉ. सतीश पाटील यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन निवडून आलो नाही तर वडिलांचं नाव लावणार नाही, अशी प्रतिज्ञा केलीय.

पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. याठिकाणी मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. सतीश पाटील हे विजयी झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले जिल्ह्यातील ते एकमेव उमेदवार आहेत. पारोळा एरंडोल हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे. पारोळा नगराध्यक्ष भाजपचा असून भाजपची ताकद ही पारोळ्यात आहे. एरंडोल येथेही भाजपा कार्यकर्ते सक्रिय असून केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या कार्यकाळातील कामकाजामुळे भाजपकडे झुकणारा एक वर्ग येथे आहे. माजी खासदार ए.टी. पाटील यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्याने ते सध्या शिवसेना-भाजपाच्या विरोधात असल्याचे चित्र आहे. यावेळी एरंडोलमध्ये त्यांची काय भूमिका राहील हे देखील पाहण्यासारखं आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. असं असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराने येथे विजय मिळवला आहे. येथे चिमणराव पाटील यांनी मागील लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश पाटील यांच्याशी विजयासाठी संघर्ष केला होता. या मतदारसंघात राज्यातील सत्तेच्या विरोधात आमदार देण्याची परंपरा असून आमदार सातत्याने बदलत असतो. चिमणराव पाटील आजही शिवसेनेतर्फे उमेदवारीसाठी मजबूत दावेदार असून शिवसेनेकडे दुसरा उमेदवार आज चर्चेत नाही. मागील निवडणुकीत मोदी लाटेत अनेक आमदार भुईसपाट होत असताना जिल्ह्यात विरोधी पक्षातील एकमेव डॉ. सतीश पाटील निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे आ. सतीश पाटील हे आजही मजबूत दावेदार असून इतर उमेदवाराची चर्चा नाही. नदीजोड प्रकल्प आणि पालकमंत्री असताना केलेली कामे यामुळे सतीश पाटील यांची एक स्वतःची अशी एक प्रतिमा जनतेत आहे. त्यामुळे सतीश पाटील हे आजही लोकप्रिय उमेदवार मानले जातात. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार वसंतराव मोरे हे देखील असून पक्ष संघटनेत त्यांचे मोठे योगदान असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूत आहे. मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांना इव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, जर पुन्हा निवडून आलो नाही तर वडिलांचे नाव लावणार नाही असं त्यांनी खुलं आव्हान दिलं आहे. त्यांची ही भीष्म प्रतिज्ञा या मतदारसंघात चर्चेची ठरली आहे. गिरीश महाजन यांनीदेखील त्यांचे आव्हान स्वीकारले असून यावेळी डॉ. सतीश  पाटील यांचा पराभव निश्चित असल्याचं म्हटलं आहे. दोघांच्या आव्हान प्रतिआव्हानात आता कोण बाजी मारतो याकडे मतदार संघाचे लक्ष लागून आहे. कॉंग्रेस पक्ष या मतदारसंघात अस्तित्वहीन असून या ठिकाणी कार्यकर्त्यांची वानवा आहे. एरंडोल येथे महेंद्रसिंग पाटील हे कॉंग्रेसचे नेते असले तरीही कॉंग्रेसची ताकद कमी आहे. डॉ.सतीश भास्कर पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – ५३,७२६ चिमणराव पाटील (शिवसेना) – ५१,४३७ डॉ.सतीश पाटील २२८९ मताधिक्याने विजयी

महत्त्वाच्या बातम्या

BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Embed widget