Pandharpur Election Results 2021: अभिजीत बिचुकले यांना 23 व्या फेरीअखेर 66 मते
Pandharpur Election Results 2021: एकीकडे पंढरपूर पोटनिवडणूकीची मतमोजणी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत असताना 23 व्या फेरीअखेर उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी 66 मते घेतली आहेत. सध्या त्याचीच चर्चा जोरात सुरू आहे.
सोलापूर: पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीच्या 23 व्या फेरीअखेर अभिजीत बिचुकले यांना केवळ 66 मते मिळाली आहेत. त्यांच्या या मतांची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांच्यावर सुमारे 6334 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चिंतेत भर पडली आहे.
वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आपल्या वेगवेगळ्या स्टंट आणि वक्तव्याने ते कायम चर्चेत असतात. खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानी निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा खुलं आव्हान दिलं आहे. अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी बिचुकले यांना अद्याप यश आलेलं नाही. '2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्यानी केलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- West Bengal Election Results 2021 : पश्चिम बंगालमधील यशाबद्दल शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
- West Bengal Election Results 2021 : 'दीदी ओ दीदी' टिप्पणीला जनतेचं सडेतोड उत्तर, अखिलेख यादव यांचा भाजपवर निशाणा
- Odisha Lockdown: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ओडिशात 5 ते 15 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित