एक्स्प्लोर
पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्त पणजी विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर
मनोहर पर्रिकर यांचं 17 मार्च रोजी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या पार्थिवावर 18 मार्च रोजी मिरामार बीचवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोवा : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 19 मे रोजी जाहीर झाली आहे. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासोबत ही पोटनिवडणुक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल लोकसभा निवडणुकीबरोबरच 23 मे रोजी जाहीर होणार आहे.
22 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. 29 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. 30 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. 2 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.19 मे रोजी निवडणूक होणार असून 23 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
पणजी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक कोण लढवणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पर्रिकर यांचा मुलगा उत्पल यांचं नावाची चर्चा आहे. तर मनोहर पर्रिकर यांच्या दोन्ही मुलांनी पक्षाचं काम करावं, अशी विनंती भाजपने दोन्ही मुलांना केली आहे.
मनोहर पर्रिकर यांचं 17 मार्च रोजी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या पार्थिवावर 18 मार्च रोजी मिरामार बीचवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संबंधित बातम्या
पणजी विधानसभा पोटनिवडणूक मनोहर पर्रिकरांचा मुलगा लढवणार?
लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement