Srinivas Vanaga: 36 तासांपासून गायब, पोलिसांची शोधाशोध; मध्यरात्री 3 वाजता श्रीनिवास वनगा अचानक घरी आले, पत्नीला म्हणाले...
Palghar Srinivas Vanaga: नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा आता कुटुंबीयांच्या संपर्कात आल्याचा पाहायला मिळतंय.
Palghar Srinivas Vanaga पालघर: आपल्या पुनर्वसनाच्या चिंतेमुळे 36 तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) यांचा कुटुंबीयांची संपर्क झाला आहे . मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आमदार श्रीनिवास वनगा हे आपल्या घरी येऊन पुन्हा माघारी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिली नसल्याने मी व्यथीत झालो आहे आणि त्यामुळे मला आरामाची गरज आहे, असं सांगून श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा माघारी गेल्याची माहिती समोर आली आहे.
नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा (Palghar Srinivas Vanaga) आता कुटुंबीयांच्या संपर्कात आल्याचा पाहायला मिळतंय. यामुळे कुटुंबियांचं पोलिसांची चिंता आता काहीशी कमी झाली आहे. मात्र घरी परतलेले श्रीनिवास वनगा आपल्या मित्रांसोबत परत कुठे गेले हे आपल्या पत्नीला देखील त्यांनी सांगितलेलं नाही. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा आता यापुढे आपली राजकीय भूमिका काय घेतात हे येत्या काळातच स्पष्ट होऊ शकतं.
सध्या श्रीनिवास वनगा यांचीच चर्चा-
पालघर विधानसभेचे शिंदे गटाचे विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापून पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना उमेदवारी देण्यात आली. राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यानंतर श्रीनिवास वनगा चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर श्रीनिवास वनगा यांनी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली. या सर्वप्रकरणानंतर ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणात श्रीनिवास वनगा यांचीच सध्या चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदेंकडून आश्वासन-
श्रीनिवास वनगा हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने आकांत केला होता. माझे पती डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांनी अन्नपाणी सोडून दिले आहे, असेही त्यांच्या पत्नीने म्हटले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी वनगा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. श्रीनिवास वनगा यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात येईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्या पत्नीला दिल्याचे समजते. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे श्रीनिवास वनगा ही निवडणूक लढवणार नाहीत, ही बाब स्पष्ट आहे.
श्रीनिवास वनगा मध्यरात्री घरी परतले नंतर पुन्हा घराबाहेर पडले, Video:
संबंधित बातमी:
Srinivas Vanaga: बंडावेळी नाचले, तिकीट कापताच ढसाढसा रडले; शिंदे गटातील श्रीनिवास वनगा आहे तरी कोण?